Tirupati Balaji Temple : तिरुपतीच्या प्रसादात जनावरांची चरबी; चंद्राबाबूंचा जगनमोहन यांच्यावर सर्वात मोठा वार

Tirupati Ladoo Row Chandrababu Naidu Pawan Kalyan Jagan Mohan Reddy : चंद्राबाबू नायडू यांनी थेट जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.  
Chandrababu Naidu, Jagan Mohan Reddy
Chandrababu Naidu, Jagan Mohan ReddySarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा वार केला आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि माशांचे तेलाच अंश आढळून आल्याचा दावा चंद्राबाबूंच्या पक्षाने केला आहे. त्याला रेड्डी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत चंद्राबाबूंनी जगनमोहन यांच्या भोवतीचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे.

बालाजी मंदिर हे कोट्यवधी भक्तांचे श्रध्दास्थान आहे. मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिले जातात. या प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये नावरांची चरबी आणि माशांचे तेल होते, असा दावा चंद्राबाबूंनी केला आहे. याचवर्षी जून महिन्यात जगनमोहन यांचे सरकार उखडून टाकत चंद्राबाबूंनी पुन्हा सत्ता मिळवली. त्यानंतर महिनाभरातच मंदिर व्यवस्थापनाने तुपाचे नमुने तपासणीसाठी गुजरात येथील प्रयोगशाळेत पाठवले.

Chandrababu Naidu, Jagan Mohan Reddy
Amit Shah on Congress : 'पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याच्या वक्तव्याने हे स्पष्ट झाले की...' ; अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा!

प्रयोगशाळेच्या रिपोर्टनुसार तुपामध्ये भेसळ असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल 18 सप्टेंबरला आला. त्यानुसारही जनावरांची चरबी आणि माशाच्या तेलाचे अंश असलेल्या तुपापासून प्रसादाचे लाडू बनवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून मुख्यमंत्री नायडू यांनी जगनमोहन सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

मागील सरकारने श्रध्दाळूंच्या भावना दुखावल्या आहे. मंदिराच्या पवित्रतेला धक्का पोहचवला आहे. माझे सरकार आल्यानंतर हा प्रकार थांबवला आहे. आता आलेला अहवाल जुलै महिन्यातील असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले आहे. नायडू यांच्या या आरोपांमुळे जगनमोहन यांच्याविषयी रोष वाढू लागला आहे. दोषींवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे आता नायडू काय कारवाई करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Chandrababu Naidu, Jagan Mohan Reddy
Amit Shah on Congress : 'पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याच्या वक्तव्याने हे स्पष्ट झाले की...' ; अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा!

कोण पुरवते तूप?

मागील 50 वर्षांपासून कर्नाटक सहकारी दूध फेडरेशनकडून नंदिनी या प्रसिध्द ब्रँडचे तूप मंदिर प्रशासनाला पुरवले जात होते. जुलै 2023 मध्ये प्रशासनाने हे तूप घेणे थांबवले. त्यानंतर जगनमोहन यांच्या सरकारने अन्य पाच संस्थांकडे तूप पुरविण्याची जबाबदारी दिली. त्यानंतर यावर्षी जुलै महिन्यात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये भेसळ आढळून आल्यानंतर नायडू सरकार सतर्क जाले होते. त्यामुळे सरकारने पुन्हा नमुने तपासणीसाठी पाठवले होते.  तसेच पुन्हा एकदा कर्नाटक फेडरेशनकडून तूप घेण्यास सुरूवात केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com