Andhra Pradesh Assembly Election Sarkarnama
देश

Lok Sabha Election Voting Update : मतदानाच्या रांगेतच मतदाराने लगावली आमदाराच्या कानशिलात; रांगेवरून झाला वाद...

MLA A Sivakumar News : शिवकुमार हे वायएसआरसीपीचे विद्यमान आमदार असून उमेदवारही आहेत. या घटनेनंतर त्यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाल्याची चर्चा आहे.

Rajanand More

Amaravati News : देशात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Voting Update) चौथ्या टप्प्याच मतदान सुरू आहे. आंध्र प्रदेशात लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होत आहे. राज्यात लोकसभेच्या 25 आणि विधानसभेच्या 125 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचीच सत्ता पुन्हा येईल, अशी चर्चा असतानाच त्यांच्याच एका विधानसभेच्या उमेदवाराने मतदानाच्या रांगेतच एका मतदाराला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्याआधी मतदारानेही आमदाराच्या कानशिलात लगावली. विशेष म्हणजे हे आमदार उमेदवारही आहेत.

जगनमोहन (Jagan Mohan Reddy) यांच्या वायएसआर काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उमेदवार असलेले ए. शिवकुमार (A Sivakumar) यांनी केलेल्या मारहाणीमुळे मतदारांमध्ये संताप निर्माण जाला आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) गुंटूर जिल्ह्यातील तेनाली येथील एक मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. आमदारने आपल्या मतदारसंघातील मतदाराला मारहाण केली आहे. (Andhra Pradesh Assembly Election 2024)

तेनाली येथील एका मतदान केंद्रावर मतदार (Voting) रांगेत उभे होते. यावेळी आमदार शिवकुमार हे रांगेत न थांबता थेट मतदानासाठी मतदान केंद्रात गेले. त्यावेळी एका मतदाराने (Voter) त्यावर आक्षेप घेत सुनावले. मतदान करून आल्यानंतर शिवकुमार आणि संबंधित मतदारामध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यानंतर शिवकुमार यांनी थेट मारहाण सुरू केली. त्यानंतर मतदाराने त्यांच्या कानशिलात लगावली. हे पाहताच आमदारांसोबत असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनीही संबंधित मतदाराला जबर मारहाण केली. (Latest political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा प्रकार घडल्यानंतर काही काळ मतदान केंद्रात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. आजूबाजूला बसलेल्या महिला मतदारांसह इतरांनीही वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या कार्यकर्त्यांना पाहून कुणी मतदाराच्या मदतीला आले नाही. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून शिवकुमार यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

शिवकुमार हे स्वत: उमेदवार आहेत. मतदानाच्या दिवशी उमेदवारांकडून मतदारांना कोणताही त्रास होणार नाही, याची आवर्जून काळजी घेतली जाते. त्यांची सर्वप्रकारे मदत करण्यासाठी उमेदवार पुढे सरसावतात. पण शिवकुमार यांच्या या कृतीमुळे आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. याचा फटका त्यांना मतदानात बसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT