Swati Maliwal : मोठी बातमी : केजरीवालांच्या PA कडून खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण; पोलिस CM हाउसमध्ये...

Arvind kejriwal News : मालीवाल या केजरीवालांच्या विश्वासू सहकारी असून दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षही आहेत. त्यांच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे.
Arvind Kejriwal, Swati Maliwal
Arvind Kejriwal, Swati MaliwalSarkarnama

New Delhi News : आम आदमी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. केजरीवालांचे खासगी सचिव बिभव कुमार यांच्याकडून मालीवाल यांना मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांनाच याबाबक केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानातून फोन आल्याचे सांगितले जात आहे.

मालीवाल या राज्यसभेच्या खासदार (Rajya Sabha MP) असून दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षाही आहेत. ‘न्यूज 18’ने याबाबतचे वृत्त पोलिसांतील सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सोमवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक कॉल आला होता. आपण स्वाती मालीवाल बोलत असल्याचे सांगून सीएम हाऊसमध्ये सीएमच्या (अरविंद केजरीवाल) पीए मारपीट केल्याचे फोनवरून सांगण्यात आले. (Arvind kejriwal News)

Arvind Kejriwal, Swati Maliwal
Lok Sabha Election 2024 : अमित शाहांनी सांगितले 400 पारचे गणित; दक्षिण भारताबाबत मोठा दावा...

थोड्या वेळात दुसरा कॉल आला. त्यामध्ये सीएमच्या सांगण्यावरून पीए बिभवने आपल्याला मारहाण केल्याचे या कॉलमध्ये सांगण्यात आल्याचा दावा पोलिस सुत्रांनी केला आहे. या कॉलनंतर पोलिस (Delhi Police) सीएम हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, स्वाती मालीवार यांनी आपल्यासोबत मारहाण झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र, त्यांनी मेडिकल तपासणी करण्यास नकार दिला आहे. त्या नंतर लेखी तक्रार देतील, असेही त्यांनी पोलिसांना सांगितल्याच न्यूज 18 च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

भाजपक़डून टीकास्त्र

दिल्ली भाजपने या प्रकारावरून टीका केली आहे. ज्या केजरीवालांच्या घरात महिला आयोग्या अध्यक्ष सुरक्षित नाहीत, त्या सत्तेचं आणखी काय सांगावं? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं, अशी टीका भाजपने केली आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले आहे की, आज सकाळी केजरीवाल यांच्या घरी स्वाती मालीवाल यांना पोलिसांना का बोलवावे लागले? केजरीवालांचे पीए बिभव यांनी स्वाती मालीवाल यांना मारहाण केली आहे का? मुख्यमंत्र्यांचे कार्यालय स्पष्टीकरण देईल का?

Arvind Kejriwal, Swati Maliwal
Kejriwal Vs Modi : अरविंद केजरीवाल यांचे 'या' 10 गॅरंटीतून थेट PM मोदींना चॅलेंज!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com