Chandrababu Naidu Family Sarkarnama
देश

Chandrababu Naidu : चंद्राबाबूंच्या पत्नीच्या संपत्तीत पाच दिवसांत तब्बल 535 कोटींनी वाढ; इतके पैसे आले कुठून?

Nara Bhuvaneshwari Nara Lokesh Andhra Pradesh Assembly Election Chandrababu Naidu Wealth Increased by 500 crores in 5 days : आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. लवकरच ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

Rajanand More

Andhra Pradesh : तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी व मुलाची संपत्ती पाच दिवसांतच कोट्यवधी रुपयांनी वाढली आहे. टीडीपीने राज्यातील जगनमोहन रेड्डी यांची सत्ता उलथवून टाकली असून लोकसभा निवडणुकीतही धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयानंतर चंद्राबाबूंच्या पत्नीच्या संपत्तीत तब्बल 535 कोटींची भर पडली आहे.

हेरिटेड फुड्स ही चंद्राबाबूंच्या मालकीची कंपनी आहे. 1992 मध्ये त्यांनी ही कंपनी सुरू केली आहे. या कंपनीच्या शेअरचे भाव तीन जूनला 424 रुपये होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शेअरचे भावाने अचानक उसळी घेतली आणि थेट 650 रुपयांच्या पुढे गेले.

कंपनीमध्ये चंद्राबाबूंच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांचे 2 कोटी 26 लाख 11 हजार 525 तर पुत्र नारा लोकेश यांच्याकडे 1 कोटी 37 हजार 453 शेअर्स आहेत. निकालानंतर शेअरचे भाव वाढताच भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत 535 कोटींची वाढ झाली. तर मुलाची संपत्तीही तब्बल 237.8 कोटींनी वाढली.

नारा लोकेश हेच कंपनीचा कारभार सांभाळत. कंपनीचे दोन स्वतंत्र व्यवसाय आहेत. त्यामध्ये डेअरी आणि अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रात ही कंनी कार्यरत आहे. हेरिटेज कंपनीचे दूध आणि दूधापासून बनवलेल्या पदार्थ्यांची आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मागणी असते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत चंद्रबाबूंच्या टीडीपीला १६ जागा मिलाल्या आहेत. त्यांनी 17 जागांवर निवडणूक लढवली होती. तर विधानसभा निवडणुकीत टीडीपीला 175 पैकी तब्बल 135 जागांवर विजय मिळाला आहे. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावे लागले. एनडीएतील जनसेवा पक्षाला 21 आणि भाजपला आठ जागा मिळाल्या. काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT