BJP Lose Ayodhya Analysis: रामजन्मभूमीत भाजपचा पाडाव का?

Faizabad Lok Sabha 2024 Result Analysis Why BJP Lost in Ayodhya : ज्यांची जमीन मंदीरासाठी गेली, अशा अनेक जणांना त्यांचा मोबदला अद्यापही मिळाला नसल्याची माहिती आहे. हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला त्याचा परिणाम भाजपच्या मतदानावर झाला.
BJP Lose Ayodhya Analysis
BJP Lose Ayodhya AnalysisSarkarnama
Published on
Updated on

Faizabad BJP lose reasons:अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरात 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकली, अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपचे नेत वावरत होते. मात्र, प्रत्यक्ष अयोध्येमध्ये म्हणजे फैजाबाद (Faizabad) लोकसभा मतदारसंघात भाजपचा पाडाव झाला.

उत्तर प्रदेशातील फैजाबाद,ज्या मतदारसंघात राम मंदिर बांधले (Ayodhya Ram Mandir) गेले त्याठिकाणी भाजप उमेदवार लल्लू सिंह (Lallu Singh) यांचा पराभव झाला. त्याचा धक्का अनेकांना बसला आहे. लालू सिंह यांचा समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद यांनी सुमारे 54 हजार मतांनी पराभव केला. फैजाबादमधील भाजपच्या पराभवाची कारणे समोर येत आहे.

राममंदिरासाठी भूसंपादन आणि त्याच्यासाठी देण्यात आलेला मोबदला यावरुन स्थानिकामध्ये भाजपच्या विरोधात रोष होता. ज्यांची जमीन मंदीरासाठी गेली अशा अनेक जणांना त्यांचा मोबदला अद्यापही मिळाला नसल्याची माहिती आहे. हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला त्याचा परिणाम भाजपच्या मतदानावर झाला.

ज्या ठिकाणी चार महिन्यापासून ठिकाणी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली त्याच ठिकाणी भाजपला पराभवाची धुळ चाखावी लागली. न्यायालयाच्या निकालामुळे अयोध्येतील राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला, पण त्यांचे श्रेय न्यायालयाला न देता नरेंद्र मोदी यांचे राम लल्लाला मंदिराबाबतचे फलक अयोध्या परिसरात दिसत होते.

“आम्ही खूप मेहनत केली, आम्ही यासाठी लढलो, पण राम मंदिराचा अभिषेक मतांमध्ये रूपांतरित झाला नाही,” असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

BJP Lose Ayodhya Analysis
BJP Politics: राणे बंधूंचे तोंड पुन्हा सुटलंय...भाजपचे नेतृत्व आतातरी आवर घालणार का?

भाजपने फैजाबाद गमावल्याची ही आहेत कारणे

  1. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन वाद झाला. शंकराचार्यांनी निमंत्रणावरुन, प्राणप्रतिष्ठापनेवरुन भाजप, मोदींना विरोध केला. काही स्थानिक पुजाऱ्यांनी देखील टीका केली. या सगळ्याचा फटका निवडणुकीत भाजपला बसला.

  2. राज्यघटनेमध्ये बदल करण्यासाठी भाजपला ४०० जागांची गरज असल्याचे विधान फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे तत्कालीन खासदार लालू सिंह यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी प्रचारात भाजपला कोंडीत पकडले.

  3. काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी लालू सिंह यांच्या राज्यघटना बदलण्याचा मुद्दा उचलून धरला. आपल्या प्रत्येक सभेत त्याचा उल्लेख करीत भाजप राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण केले. त्यानंतर देशभर हा मुद्दा गाजला होता, याचा फटका बसून फैजाबादमध्ये भाजपला हक्काची जागा गमवावी लागली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com