Kadambari Jethwani Sarkarnama
देश

Kadambari Jethwani Case : मुंबईतील अभिनेत्रीला 40 दिवस कोठडीत ठेवलं; आंध्र प्रदेश सरकारकडून IPS अधिकाऱ्यांचं निलंबन!

Kadambari Jethwani and Andhra Pradesh IPS Officers : मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिला चुकीच्या पद्धतीनं अटक केल्याबद्दल तीन IPS अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Pradeep Pendhare

Mumbai Actress Kadambari Jethwani : मुंबईमधील अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीनं अटक करून तिला तब्बल 40 दिवस पोलिस कोठडीत ठेवल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारनं तीन वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळं नेमकं काय प्रकरण, याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिनं त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात योग्य तपास केला नाही. त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांना अटक करत 40 दिवस कोठडीत छळ केल्याचा आरोप केला आहे.

डीजी रँक असलेले माजी गुप्तचर प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू, महानिरीक्षकचा दर्जा असलेले माजी विजयवाडा पोलिस (Police) आयुक्त क्रांती राणा टाटा आणि अधीक्षक दर्जाचे माजी पोलिस उपायुक्त विशाल गुन्नी या तिघांना आंध्र प्रदेश सरकारनं निलंबित केलं आहे. या तिघा अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीचा छळ केल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिनं आंध्र प्रदेश सरकारकडे तक्रार केली होती.

आंध्र प्रदेश सरकारनं अलीकडच्या काळात IPS अधिकाऱ्यांवर केलेली ही मोठी कारवाई आहे. अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिने ऑगस्टमध्ये एनटीआरचे पोलिस आयुक्त एस. व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

काय आहे प्रकरण? -

वायएसआर काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री कादंबरीविरुद्ध फसवणुकीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. विद्यासागर यांच्यासह उच्च पोलिस अधिकाऱ्यांनी त्यात पूर्वकल्पना न देता कादंबरी आणि तिच्या आईवडिलांना अटक केली. अटक करताना कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईहून विजयवाडा इथं नेण्यात आलं. पोलिसांनी वारंवार अपमान केला आणि बेकायदेशीरपणे कादंबरी आणि तिच्या वृद्ध आईवडिलांना ताब्यात ठेवलं.

तिच्यासह कुटुंबाला 40 दिवसांपेक्षा जास्त काळ न्यायालयीन कोठडीत राहण्यास भाग पाडलं, अशी तक्रार कादंबरी हिनं केली आहे. तसंच कादंबरी आणि तिच्या कुटुंबाला अडकवण्यासाठी जमिनीची बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोपात देखील पोलिसांनी जामीन अर्ज करू दिला नाही.

IPS अधिकारी कसे दोषी आढळले -

कादंबरी जेठवानी हिनं आंध्र प्रदेश सरकारकडं तक्रार केल्यानंतर हा प्रकार गंभीर असल्याचं लक्षात आल्यावर तपास करण्यात आला. या तपासात कादंबरी यांच्या तक्रारीत तथ्य आढळलं. यानंतर कादंबरी यांच्या तक्रारीवर आंध्र प्रदेश सरकारनं तिघा IPS अधिकाऱ्यांचं निलंबन केलं. गंभीर गैरवर्तन, कर्तव्यात कसूर केलं आहे. तसंच पी. सीताराम अंजनेयुलू यांनी अभिनेत्रीच्या अटकेसाठी सूचना दिल्या असताना FIR नोंदवण्यात आला नव्हता. 31 जानेवारीला अटकेचा आदेश दिल्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी FIR दाखल करण्यात आला.

अभिनेत्री कादंबरी जेठवानी कोण आहे? -

कादंबरी जेठवानी मॉडेल आणि अभिनेत्री असून, तिनं 2015 मध्ये फेमिना मिस गुजरात स्पर्धा जिंकली होती. ती फेमिनाची कव्हर गर्ल राहिली आहे. कादंबरी जेठवानी हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये अभिनय करते. तसंच मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं असून मॉडेलिंग देखील करत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT