Haryana Congress : हरियाणात काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?; चौधरी बीरेंद्र सिंह यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले..

Chaudhary Birendra Singh News : 'भाजप कुणालाही मोठा नेता बनू देवू इच्छित नाही. राव इंद्रजीत आतापर्यंत 'एमओएस'च्या पुढे जावू शकले नाहीत.' असा टोलाही लगावला आहे.
Chaudhary Birendra Singh
Chaudhary Birendra SinghSarkarnama
Published on
Updated on

Haryana Vidhansabha Election and Congress : हरियाणा विधानसभा निवडणुकीबाबत प्रत्येक पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहे. तर आरोप-प्रत्यारोपही जोरदार सुरू आहेत. या दरम्यान काँग्रेस नेते चौधरी बीरेंद्र सिंह यांनी निशाणा साधत म्हटले की हरियाणाचे लोक भाजपच्या धोरणांमुळे दुखावलेले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.

जिंदमध्ये मीडियाशी बोलताना काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? या प्रश्नावर चौधरी बीरेंद्र सिंह म्हणाले, 'मुख्यमंत्री नेहमीच हायकमांड कडूनच ठवरला जातो. काँग्रेस मुख्यमंत्र्यांना घेवून मोहीम राबवत नाही. कोण मुख्यमंत्री असेल हे ८ ऑक्टोबर नंतर ठरेल.'

त्यांनी हेही म्हटले की 'तिकीट वाटपाची मोजणी करून कोणीही अंदाज लावू शकत नाही, की मुख्यमंत्री कोण असेल? त्यांनी म्हटले की, भूपेंद्र सिंह हुड्डा(Bhupendra Singh Hooda), कुमारी शैलजा आणि रणदीप सुरजेवाला तिन्ही गटातील लोकांना तिकीट दिलं गेलं आहे.

Chaudhary Birendra Singh
Haryana Assembly Election On Congress : हरियाणा जिंकायचंच, काँग्रेसकडून स्टार प्रचारकांसह अनुभवी निरीक्षकांची नियुक्ती

याशिवाय काँग्रेस(Congress) नेत्याने असेही सांगितले की, हरियाणात मुस्लिम मतदारस पाच टक्क्यांच्या जवळपास आहेत, जे काँग्रेसला पाठिंबा देतील. कारण, भाजप त्यांच्यावर दबाव टाकत असते. काँग्रेस एका जातीचा पक्ष नाही. भाजप कुणालाही मोठा नेता बनू देवू इच्छित नाही. राव इंद्रजीत आतापर्यंत एमओएसच्या पुढे जावू शकले नाहीत.

चौधरी बीरेंद्र सिंह यांनी म्हटले की, हरियाणातील प्रत्येक वर्गातील मतदार भाजपच्या(BJP) धोरणांमुळे दुखावलेला आहे. तो त्यांची धोरणं आणि कार्यशैलीला चांगलं मानत नाही. ते काँग्रेसच्या बाजूंने उभा आहेत. कोणत्याही जातीचा मुद्दा नाही. हे खरं आहे की जाट मोठ्यासंख्येने काँग्रेसच्या बाजूने आहेत आणि राजकीय लढाई लढण्यात नेहमीच सक्षम राहिले आहेत, मात्र दुसऱ्याही पक्षात जाट आहेत.

Chaudhary Birendra Singh
JJP-ASP Alliance : हरियाणा विधानसभेसाठी 'जेजेपी' - 'आजाद समाज पार्टी'ची आघाडी ; जागा वाटप जाहीर!

तसेच त्यांनी म्हटले की, हे म्हणणं उचित ठरणार नाही की, ही जाट आणि गैरजाट यांच्यातील लढाई आहे. कोणत्याही एका जातीच्या आधारावर कोणीही कधी निवडणूक जिंकलेली नाही आणि जिंकूही शकत नाही. हरियाणात ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आहे आणि ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com