AK Antonys Son Anil Antony Joins BJP Sarkarnama
देश

BJP News : कढी पत्यासारखं भाजप त्यांना बाहेर फेकणार..; अनिल अँटनींच्या BJP प्रवेशावर लहान भाऊ संतप्त

Anil Antony Joins BJP : ते पुन्हा काँग्रेसमध्ये येतील..

सरकारनामा ब्यूरो

Anil Antony Joins BJP : माजी संरक्षणमंत्री, काँग्रेस ज्येष्ठ नेते ए.के. ॲंटनी यांचे चिंरजीव, केरळ काँग्रेसचे नेते अनिल अँटनी यांनी काल (गुरुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

त्यावर ए.के. अँटनी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता अनिल यांचे लहान बंधू अजित अँटनी यांनी आपल्या भावाच्या भाजप प्रवेशावर टीका केली आहे. "भाजप त्यांचा वापर करुन सोडून देईल," असे अजित अँटनी म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

अजित अँटनी म्हणाले, "अनिल यांनी हा निर्णय अतिघाईत घेतलेला दिसतो. अनिल यांचा उपयोग कढी पत्यासारखा करुन भाजप त्यांना फेकून देईल,"

वडिलांना पहिल्यांदा निराश पाहिलं..

अनिल अँटनी यांच्या या निर्णयाबाबत आमच्या परिवाराला कुठलीही कल्पनी नव्हती. मी पहिल्यांदा माझ्या वडिलांचा (ए.के अँटनी) खूप निराश पाहिले. अनेक काँग्रेस समर्थकांचे त्यांना फोन येत असून ते वाईट भाषेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत," अनिल हे फार काळ भाजपमध्ये राहणार नाहीत, ते पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, असे अजित म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीबीसीवरील माहितीपटावर अनिल टीका केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. भाजप नेता पियुष गोयल, वी मुरलीधरन आणि केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या उपस्थित अनिल अँटनी यांनी एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचा राजीनामा देण्यापूर्वी अनिल अँटनी हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे प्रमुख होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यापूर्वी त्यांनी 2002 च्या गुजरात दंगली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंट्रीवर "भारताच्या विरोधात पक्षपातीपणा" अशा शब्दात टीका केली होती. या माहितीपटावरुन काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल केला होता. मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या वादानंतर अनिल अँटनी यांनी जानेवारीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT