Kiran Kumar Reddy : काँग्रेसला मोठा झटका ; माजी मुख्यमंत्री रेड्डी यांचा भाजपमध्ये प्रवेश

Kiran Kumar Reddy to Join BJP : काही दिवसापूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
Kiran Kumar Reddy
Kiran Kumar ReddySarkarnama
Published on
Updated on

Kiran Kumar Reddy to Join BJP : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील मोठे राज्य असलेल्या आंध्रप्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

किरण कुमार यांनी आज (शुक्रवारी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

Kiran Kumar Reddy
Karnataka Assembly Election : भाजप उमेदवारीचे पत्ते खुले करणार ; प्रत्येक विधानसभेसाठी तीन नावांची शॉर्टलिस्ट..

'काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक राज्य काँग्रेसपासून दूर जात आहेत,' असे रेड्डी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला तेव्हा म्हटलं होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसचे लोकसभा खासदार मणिकम टागोर म्हणाले होते की, ज्या व्यक्तींना पक्षाकडून खूप काही लाभ मिळाला, ते आता भाजपमध्ये जात आहेत.

किरण कुमार रेड्डी यांनी ११ मार्च रोजी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने आंध्रप्रदेशचे विभाजन करुन तेलगंणा राज्याची निर्मिती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला रेड्डी यांनी विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत 'जय समैक्य आंध्र पार्टी' ची स्थापना केली होती. पण २०१८ मध्ये पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

Kiran Kumar Reddy
Nitin Gadkari Threat Case: गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट; चौकशीत धक्कादायक खुलासे, केंद्रीय तपास यंत्रणेकडे..

रेड्डी यांनी १९८९ मध्ये आपल्या राजकीय जीवनाची सुरवात केली होती. ते वायलपाडू येथून काँग्रेसच्या तिकीटावर निवडूण आले होते. रेड्डी हे १९९९ आणि २००४ मध्ये एकाच मतदारसंघातून तर २००९ मध्ये पिलेरु विधानसभा मतदार संघातून आमदार झाले होते. २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आयएस राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांनी २०१०मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशचे नेतृत्व केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com