माल्डा (पश्चिम बंगाल) : महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बिहारचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी आज पुन्हा एकदा खळबळजनक विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. काल केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण देताना यादव म्हणाले की, सुमारे ७० ते ८० टक्के राजकारणी ‘पॉर्न’ पाहतात. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बिहार राज्य महिला आयोगाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देताना खासदार पप्पू यादव यांनी खळबळजनक विधान केले. ‘‘७० ते ८० टक्के राजकारणी ‘पॉर्न’ पाहतात, असे मी संसदेतही बोललो आहे. त्यामुळे सर्वांचीच तपासणी करा. माझ्या फोनमध्ये ‘पॉर्न’ आढळल्यास माझीही चौकशी करा, असंही पप्पू यादव यांनी म्हटलं आहे.
यादव यांच्या विधानाची बिहार राज्य महिला आयोगाने दखल (स्यू मोटो) घेतली असून त्यांना नोटीस बजावली आहे. आरोपांना प्रत्युत्तर देताना यादव म्हणाले, ‘‘मला नोटीस बजावणारे हे लोक कोण आहेत? त्यांचे माजी मंत्र्यांसोबतचे अनेक फोटो आहेत.ज्यांची घरे काचेची असतात, त्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नयेत.’’ पुरुष राजकारणी महिलांचे शोषण केल्याशिवाय त्यांना राजकारणात येऊ देत नाहीत, हे माझे विधान चुकीचे आहे का? असा सवाल करीत यादव म्हणाले की, मी महिलांच्या हक्कासाठी लढत आहे. ७५५ पुरुष राजकारण्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप असून १५५ जणांवर आरोपपत्रे दाखल आहेत. मी पुरुष राजकारण्यांबद्दल बोलत असताना महिला आयोगाला पोटशूळ का उठत आहे? हेच राजकारणी महिलांचे शोषण करतात आणि पुन्हा महिला आरक्षणाच्या गप्पा मारतात.
यापूर्वी यादव यांनी ‘९० टक्के महिलांना राजकारण्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करता येत नाही,' असे विधान केले होते. या विधानाची दखल घेत बिहार राज्य महिला आयोगाने त्यांना कडक शब्दांत नोटीस बजावली आहे. आयोगाने यादव यांचे विधान 'घृणास्पद' आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारे असल्याचे म्हटले आहे. ‘तुमचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस लोकसभा अध्यक्षांकडे का करू नये?’ अशी विचारणा करत आयोगाने तीन दिवसांत स्पष्टीकरण मागविले आहे. महिला राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे येत नाहीत, असे सुचवणे हा महिलांच्या स्वाभिमानावर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर केलेला हल्ला असल्याचे आयोगाने नोटिशीत नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.