Delhi MP Pravesh Singh Verma Latest News
Delhi MP Pravesh Singh Verma Latest News Sarkarnama
देश

भाजप खासदाराला अधिकारी चांगलाच भिडला; आपली बाजू मांडण्यासाठी चक्क अंघोळचं केली

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीत फेस दिसल्याने हा फेस घालविण्यासाठी दिल्ली जलबोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एँटी फॉगिंग केमिकलचा वापर केला. मात्र यावरून भाजप (BJP) खासदार प्रवेश सिंह वर्मा यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.

दिल्लीतील छट पूजेला येणाऱ्या लोकांना विषारी केमिकल मिश्रित पाण्यात अंघोळ करायला लावली जात आहे, असा आरोप वर्मा यांनी केला. यावरून आपल्यावर केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी अधिकारी संजय शर्मा यांनी यमुनेच्या पाण्याने अंघोळ केली. आणि खासदार वर्मा यांच्यावर तक्रारही दाखल केली आहे. यामुळे हे प्रकरणं चांगलचं गाजत आहे. (Delhi MP Pravesh Singh Verma Latest News)

खासदार वर्मा यांनी यमुनेतील हे पाणी पिऊन दाखव आणि अंघोळ करून दाखवा, असे आव्हान अधिकाऱ्यांना केले होते. यावर अधिकाऱ्यांनी त्यांना या केमिकलला अमेरिकेच्या एफडीए आणि केंद्र सरकारची परवानगी असल्याचे पत्र दाखवले मात्र तरीही वर्मा ऐकायला तयार नव्हते. यावरून अधिकारी आणि खासदार वर्मा यांच्यात वाद झाला.

यामुळे आज दिल्ली जलबोर्डाचे संचालक संजय शर्मा यांनी या पाण्याने चक्क अंघोळ केली. दरम्यान, प्रसार माध्यमांच्या कॅमेरांसमोर यमुनेचे पाणी जमा करण्यात आले आणि या पाण्यात शर्मा यांनी अंघोळ करत यमुनेचे पाणी अंघोळीसाठी योग्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या या अंघोळीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरलं होतं आहे.

दरम्यान, अधिकारी शर्मा याप्रकरणी कालिंदी कुंज पोलीस ठाण्यात खासदार वर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली असून वर्मा हे आपल्यासोबत चुकीचे वागले असून अभद्र भाषेत वाद घातला आणि यमुनेच्या पाण्यात मी विष टाकल्याचाअपप्रचार केला असा त्यांनी आरोप केला आहे.

या केमिकलला अँटी फोमिंग केमिकलला डीजेबीची मंजुरी असून यास केंद्रीय मंत्रालयाने देखील मंजुरी आहे. यासोबतच स्वच्छ गंगा मिशन अंतर्गत शिफारसही करण्यात आली. तरी देखील वर्मा यांच्यासह काही लोकांनी आपल्या कामात अडथळा आणल्याचे आणि धमक्या दिल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आता याप्रकरणी काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT