Uttar Pradesh News : भाजपाचे खासदार राजकुमार चाहर यांचा पोलिसाबरोबर वादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहर हे संरक्षणमंत्री राजनाथ शिंह यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर गाडी मुख्य प्रवेशद्वारातून आत नेताना त्यांच्यात व एका पोलीस अधिकाऱ्याबरोबर बाचाबाची झाली.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, उत्तरप्रदेशातल्या फतेहपूर सिक्री लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे (BJP) खासदार चाहर पोलीस निरीक्षकाशी वाद घालत आहेत. तर पोलीस निरीक्षकही खासदारांना उत्तर देताहेत. या दोघांनाही तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी शांत करण्याचा प्रयत्न केला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची रविवारी आग्र्यात सभा होती. फतेहपूर सिक्री मतदारसंघ आग्रा जिल्ह्यात येतो. याच लोकसभा मतदारसंघातील कागरोल गावात मंत्री सिंह यांची सभा होती. त्यामुळे संरक्षणमंत्र्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजकुमार चाहरही कार्यक्रमस्थळी पोहोचले. कार्यक्रम संरक्षणमंत्र्यांचा असल्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमस्थळी मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस निरीक्षक उत्तम चंद पटेल सुरक्षेसाठी तैणात होते. त्याचवेळी चाहर तिथे आले. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही गाड्या कार्यक्रमाच्या ठिकाणी न्यायच्या होत्या. मात्र, पोलीस निरीक्षक पटेल यांनी त्यांना रोखले. पोलीस अधिकारी म्हणाले, केवळ तुमची कार मुख्य प्रवेशद्वारातून आत जाऊ शकते.
पोलीस (Police) निरीक्षकांनी आपली कार थांबवणे खसदारांना काही आवडले नाही. त्यावरुन त्यांनी पटेलांशी वाद घतला. त्यावेळी पटेल खासदारांच्या कारसमोर हात जोडून उभे राहिले. खासदार चाहर पोलीस निरीक्षकाला म्हणाले, किस पार्टी के कार्यकर्ता हो तुम, कराउंगा तेरा अब इलाज, त्यावर पटेल म्हणाले, मी पोलीस आहे, पक्षाचा कार्यकर्ता नाही. या घटनेचा व्हिडीओ समाजवादी पार्टीने शेअर केला आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.