CM KCR Rally To Maharashtra : तेलंगाणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू झाला आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील बीआरएसच्या सभा गाजल्या. येथून राव यांनी 'अब की बार किसान सरकार' अशी घोषणा दिली. यानंतर राज्यभर असे फलक दिसून लागले आहेत. बीआरएसमध्ये राज्यातील अनेक नेत्यांनी प्रवेश केला. आता राव दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टिका केली.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ''एकीकडे म्हणतात की देशात हुकुमशाही आहे. मोदी सरकार आम्हाला राज्यात काम करू देत नाही. आमच्या नेत्यांवर ईडी, सीबीआयच्या धाडी पडतात. त्यांच्या मुलीची चौकशी केली. आता एकत्र येऊन लढायचे की त्यांना मदत होईल असे राजकारण करायचे? आम्ही हुकुमशाहीविरोधात लढतो आहोत. मात्र ते नाहीत.''
केसीआर महाराष्ट्रात येण्यामागे मोठ कारस्थान असू शकते. भारतीय जनता पक्षाने (BJP) सोडलेले मोहरे किंवा घोडे यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना किती मते पडतील या पुढचा प्रश्न आहे. त्यांची आर्थिक ताकद मोठी आहे. त्यांनी राज्यात पैशांचा खेळ सुरू केला. लोक फोडणे, पैसे वाटले प्रसिद्धी यंत्राचा सर्रास वापरले जात आहे. त्यांचा उद्देश जिंकणे नसून कुणाला तरी त्रास देणे आहे. कुणाची तरी मत विभाजन करणे हे आता स्पष्ट दिसत आहे."
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, हैद्राबादमध्ये काही शेतकऱ्यांनी कांदा नेला मात्र, त्यांची फजीती झाली. बीआरएसला मते मिळतील की नाही हे भविष्यात समजेल. राजकीय दृष्ट्या काहीतरी वेगळे आपण दाखवू शकतो, असा प्रयत्न केसीआर यांच्याकडून केला जात आहे बाकी त्यामध्ये काही नाही, असे पवार म्हणाले.
तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बीआरएसचा भाजपची 'बी टीम' म्हणून असा उल्लेख केला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांनी बीआरएसवर निशाणा साधला. ते म्हणाले, बीआरएस पक्ष ज्या उद्देशाने महाराष्ट्रात येत आहे. ते यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. राज्यातील जनता मुर्ख नाही. त्यामुळे त्यांच्या गाड्यांचा असा ताफा आल्याने काही फरक पडणार नाही.
बीआरएस पक्षाच्या घोषवाक्यात 'अब की बार किसान सरकार, अब की बार दलित सरकार' असा उल्लेख आहे. मात्र, किसान म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजे महाविकास आघाडी. त्यामुळे बीआरएस पक्ष दलित मते कापणार. या वर्गात वेगवेगळे गट असले तरी आता मात्र दलित वस्त्यांमध्ये एकता पाहायला मिळते. मंडल आयोगाचा राजकीय स्वीकार करणारा पहिला माणूस ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे मनातील स्वप्न पूर्ण केले ते शरद पवार होते, असा दावा आव्हाड यांनी दिला.
काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली. तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (BRS) ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो. हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.