Sarkarnama NCP Vs BJP
देश

NCP Vs BJP : ... म्हणून अरुणाचलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरोधात केली निवडणूक आयोगाकडे तक्रार!

सरकारनामा ब्यूरो

Arunachal Pradesh Politics : सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्ष उमेदवारी याद्या जाहीर करत आहेत, तर सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाआघाडीमध्ये अनेक जागांवर तोडगा काढण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. अशावेळी मित्रपक्षांमधील नेत्यांमध्येच अनेकदा खटकेही उडताना दिसत आहेत. मात्र, तरीही आमची आघाडी किंवा युती अखंड असल्याचं बोललं जात असून, सर्वजण एकत्रितपणे काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

एकीकडे महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशात मात्र महायुतीमधील दोन प्रमुख पक्ष असणारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलंच वाजल्याचं समोर आलं आहे. प्रकरण एवढं तापलं आहे की, अरुणाल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने(NCP) थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडेच भाजपविरोधात तक्रार नोंदवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचं कारण अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला झाला असून, हा हल्ला भाजपकडून(BJP) झाल्याचा आरोप केला जात आहे. अरुणाचल प्रदेशात लिका सय्या हे राष्ट्रवादीचे उमेदवार असून, त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली गेली आहे.

अरुणाचल प्रदेशातील नानसई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रादी काँग्रेसचे आमदार लिका सय्या यांच्यावर 7 मार्च 2024 रोजी भाजप उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला, असा आरोप आहे. या हल्ल्याबाबतच राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. एवढच नाहीतर राष्ट्रवादीचे अरुणाचल प्रदेशचे प्रभारी संजय प्रजापती यांनीही या प्रकरणी तातडीन कारवाई केली जावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT