Dharashiv Lok Sabha Constituency : अजितदादांची जागा घेतली, मोदींनी ! अर्चना पाटील यांच्या सोशल मीडियावरील फोटो जोरदार चर्चेत!

I am a candidate of Mahayuti, why should I expand the Nationalist Party : मी महायुतीची उमेदवार राष्ट्रवादी पक्ष का वाढवू ..
Archana Patil
Archana PatilSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, पाटील यांच्या फेसबुकवरील अकाउंटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेचे चिन्ह असलेल्या घड्याळाबरोबर मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता.

धाराशिव लोकसभेची (Lok Sabha) जागा महायुतीच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. या जागेवार भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशदेखील केला आहे. या पक्षप्रवेशानंतर त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेल्या अर्चना पाटील यांनी मी महायुतीची उमेदवार असल्यानं राष्ट्रवादी पक्ष का वाढवू, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Archana Patil
Loksabha Election 2024 : मंत्री गावित यांचे अजब विधान; म्हणाले, मोदींनी पाठविलेल्या योजना पोहोचविण्यात कमी पडलो...

त्यानंतर सोमवारी सकाळी अर्चना पाटील यांच्या सोशल मीडियातील पोस्टरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा फोटो न टाकता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे या पोस्टवर राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह आणि मोदी यांचा फोटो होता. ही पोस्ट सर्वत्र जोरदार व्हायरल झाली होती.

त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर संध्याकाळी यामध्ये बदल करण्यात आला. पाटील यांच्या फेसबुक टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये आता नरेंद्र मोदी, घड्याळाबरोबर आता अजित पवार यांचाही फोटो टाकण्यात आला आहे. तसेच फिर एक बार मोदी सरकार असा मजकूरदेखील लिहिण्यात आला आहे.

धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेल्या अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. उमेदवारी मिळाल्यानंतर पाटील सध्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. त्या बार्शी दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तुम्ही राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवार असून, आता बार्शीत राष्ट्रवादी वाढविणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, मी महायुतीची उमेदवार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तृळात सुरू होती. त्यातच आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्येदेखील त्यांनी ज्या पक्षाने उमेदवारी दिली, त्याच पक्षाच्या प्रमुखाचा फोटो लावणे टाळल्याने निवडणूक होईपर्यंत या मतदारसंघात आणखी काय पाहायला मिळेल, याची चर्चा दबक्या आवाजात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे.

R

Archana Patil
Chhatrapati Sambhajinagar Constituency : संभाजीनगरच्या जागेवर भाजपची दावेदारी संपली ? आता मनोमिलनाच्या बैठका...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com