Swati Maliwal - Arvind Kejariwal Sarkarnama
देश

Arvind Kejariwal Statement: स्वाती मालीवाल मारहाण आरोप प्रकरणावर मुख्यमंत्री केजरीवाल पहिल्यांदाच बोलले...

Swati Maliwal News : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पहिल्यांदाच स्वाती मालीवाल आणि त्यांचे पीए बिभव कुमार यांच्यातील कथित मारहाण आरोप प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे

Deepak Kulkarni

Delhi News : राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी 13 मे रोजी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 16 मे रोजी गुन्हा दाखल करत बिभव कुमारला अटक केली आहे.सध्या त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.मात्र, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या प्रकरणावर अखेर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मौन सोडत भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी बुधवारी (ता.22) पहिल्यांदाच स्वाती मालीवाल आणि त्यांचे पीए बिभव कुमार यांच्यातील कथित मारहाण आरोप प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,या प्रकरणाला दोन बाजू आहेत.पोलिसांनी याचा नि:पक्षपातीपणे त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही.

याचवेळी अरविंद केजरीवाल यांनी ट्विटवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी पोलिस त्यांच्या आजारी पालकांची चौकशी करण्यासाठी गुरुवारी येणार असल्याचं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पण कोणत्या प्रकरणात याची काही माहिती त्यांनी दिलेली नाही. स्वाती मालीवाल प्राणघातक हल्ल्याप्रकरणातच ही चौकशी होणार असल्याची शक्यता आहे.

आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal News) यांनी बुधवारी पुन्हा एकदा पक्षासह नेत्यांवर हल्लाबोल केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांनी मालीवाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आपनेही मालीवाल यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. पक्षाच्या नेत्यांकडून त्या भाजपच्या एजंट असल्याची टीका होत आहे. यापार्श्वभूमीवर स्वाती मालीवाल पक्षात एकट्या पडल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वाती मालीवाल काय म्हणाल्या ?

स्वाती मालीवाल यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, काल मला पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला. सगळ्यांवर कसा दबाव आहे, हे त्यांनी सांगितले. स्वातीविरोधात वाईट बोलायचे आहे, खासगी फोटो लीक करून खच्चीकरण करायचे आहे, असे सांगितले जात आहे. त्यांना मदत करणाऱ्यांना पक्षातून काढले जाईल. काहींना पत्रकार परिषद घेण्याची तर काहींना ट्विट करण्याची ड्युटी मिळाली आहे. (Swati Maliwal Latest News)

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT