New Delhi Political News : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal News) यांनी बुधवारी पुन्हा एकदा पक्षासह नेत्यांवर हल्लाबोल केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार (Bibhav Kumar) यांनी मालीवाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आपनेही मालीवाल यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. पक्षाच्या नेत्यांकडून त्या भाजपच्या एजंट असल्याची टीका होत आहे. यापार्श्वभूमीवर स्वाती मालीवाल पक्षात एकट्या पडल्या आहेत.
आपमधील (AAP) नेत्यांकडून विरोधी भूमिका घेतली जात असल्याने मालीवाल यांनी आपण ही लढाई न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील आपचा उल्लेख तसेच केजरीवालांचे (Arvind Kejriwal) फोटोही हटवले आहेत. त्यामुळे आता त्यांनीही केजरीवालांसह पक्षाविरोधात थेट भूमिका घेतल्याचे स्पष्ट घेतले आहे. (Latest Political News)
काय म्हणाल्या स्वाती मालीवाल?
स्वाती मालीवाल यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, काल मला पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला. सगळ्यांवर कसा दबाव आहे, हे त्यांनी सांगितले. स्वातीविरोधात वाईट बोलायचे आहे, खासगी फोटो लीक करून खच्चीकरण करायचे आहे, असे सांगितले जात आहे. त्यांना मदत करणाऱ्यांना पक्षातून काढले जाईल. काहींना पत्रकार परिषद घेण्याची तर काहींना ट्विट करण्याची ड्युटी मिळाली आहे. (Swati Maliwal Latest News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तुम्ही हजारोंची फौज उभी केली तरी मी एकटीच लढणार आहे, कारण सत्य माझ्यासोबत आहे, असेही मालीवाल यांनी म्हटले आहे. आरोपी खूपच शक्तीशाली आहे. मोठ्यातले मोठे नेतेही त्याला घाबरतात. त्याच्याविरोधात बोलण्याची कुणाची हिंमत नाही. मी कुणाकडून अपेक्षाही करत नाही. दु:ख एवढेच आहे की, दिल्लीच्या महिला मंत्री हसत-हसत पक्षाच्या जुन्या महिला सहकाऱ्याचे चारित्र्य हनन करत आहे. माझी स्वाभिमानाची लढाई सुरू आहे. न्याय मिळेपर्यंत लढणार आहे. या लढाईत मी एकटी असली तरी हार मानणार नाही, असा ठाम भूमिकाही मालीवाल यांनी घेतली आहे.
केजरीवालांची चुप्पी
मालीवाल यांनी केजरीवालांच्या घरी विभव यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मात्र, या प्रकरणावर केजरीवालांनी चकार शब्दही काढलेला नाही. केजरीवालांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचा आरोपही मालीवाल यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ आणखी वाढले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.