AAP leaders arrested latest news Sarkarnama
देश

AAP Leader Arrest : अरविंद केजरीवालांना मोठा धक्का! आपच्या माजी मंत्र्यांसह 6 जणांना अटक, तब्बल 1900 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप!

AAP leader arrested in ₹1900 crore scam: अरविंद केजरीवालांना मोठा धक्का! आपच्या माजी मंत्र्यासह 6 जणांना कथित 1900 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.

Rashmi Mane

AAP former minister 1900 crore scam: दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पार्टीचे (AAP) वरिष्ठ नेते सत्येंद्र जैन यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. दिल्ली जल बोर्डातील कथित सीवेज ट्रीटमेंट प्लांट (STP) टेंडर घोटाळ्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने (ACB) मोठी कारवाई केली आहे.

सत्येंद्र जैन, IAS अधिकारी उदित प्रकाश राय यांच्यासह एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आकडा तब्बल 1900 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे तपासात समोर आले आहे.

सत्येंद्र जैन हे अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारमध्ये आरोग्यासह अनेक महत्त्वाची खाती सांभाळत होते. जवळपास अडीच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी ते जामिनावर बाहेर आले होते. आता दिल्ली जल बोर्डाच्या STP प्रकल्पातील कथित गैरव्यवहारामुळे त्यांच्यावर पुन्हा कारवाई झाली आहे.

ACBने या प्रकरणात सत्येंद्र जैन आणि उदित प्रकाश राय यांच्यासह अंकित श्रीवास्तव, राजा कुमार कुर्रा, नागेंद्र यादव आणि पंकज वर्मा यांना आरोपी केले आहे. या घोटाळ्याच्या काळात उदित प्रकाश राय हे दिल्ली जल बोर्डाचे CEO होते, तर अंकित श्रीवास्तव यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. उर्वरित आरोपींचा संबंध टेंडर प्रक्रियेशी संबंधित विविध कंपन्यांशी असल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

जॉइंट पोलीस कमिश्नर विक्रमजीत सिंह यांनी सांगितले की, सतर्कता संचालनालयाच्या तक्रारीनंतर 11 मे 2024 रोजी FIR दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

या तपासा दरम्यान तत्कालीन CEO उदित प्रकाश राय यांनी 1.52 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. ही रक्कम मध्यस्थ संस्थांच्या माध्यमातून विविध बँक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. या पैशातून संपत्ती खरेदी केल्याचेही तपासात आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, 2022 मध्ये 10 सीवेज ट्रीटमेंट प्लांटच्या अपग्रेडेशनसाठी टेंडर काढण्यात आले होते. सुरुवातीला या कामाची किंमत 1546 कोटी रुपये होती. मात्र, टेंडर मिळाल्यानंतर काही काळातच ही रक्कम वाढवून 1943 कोटी रुपये करण्यात आल्याचा आरोप आहे. विशिष्ट कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी टेंडरच्या अटींमध्ये बदल केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना आता न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील चौकशीसाठी ACB कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात या कारवाईनंतर पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT