Arvind Kejriwal sarkarnama
देश

Arvind Kejriwal Video : आंबेडकरांच्या अवमानावरून राजकारण तापले; केजरीवालांनी केली मोठी घोषणा, म्हणाले 'दलित विद्यार्थ्यांना...'

Arvind Kejriwal Ambedkar Samman Scholarship : 'आप'चे प्रमुख, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'आंबेडकर सन्मान शिष्यवृत्ती' योजना जाहीर करून अमित शाह यांना उत्तर दिले आहे.

Roshan More

Arvind Kejriwal : संसदेमध्ये अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. संसदेच्या बाहेर काँग्रेस आणि भाजपचे खासदार भिडले. अमित शाह यांनी माफी मागावी या मागणीवर काँग्रेस ठाम आहे. तर, 'आप'चे प्रमुख, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'आंबेडकर सन्मान शिष्यवृत्ती' योजना जाहीर करून अमित शाह यांना उत्तर दिले आहे.

'आंबेडकर सन्मान शिष्यवृत्ती' योजने अंतर्गत दलित कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि परदेशी विद्यापीठात जाण्याचा खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, "दलित समाजातील कोणताही मुलगा पैशांअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी डॉ. आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर करतो. कोणत्याही दलित मुलाला जगातील कोणत्याही सर्वोच्च विद्यापीठात शिक्षण घ्यायचे असेल, तर त्याने तिथे फक्त प्रवेश घ्यावा. त्या विद्यापीठातील प्रवेशाचा, त्याच्या अभ्यासाचा खर्च आणि प्रवासाचा सर्व खर्च दिल्ली सरकार उचलेल."

"आंबेडकरांनी परदेशात शिक्षण घेतल्यानंतर दोनदा पीएचडी केली. स्वतंत्र भारतात कोणत्याही मुलाला परदेशी विद्यापीठात शिकताना कोणतीही अडचण येऊ नये. म्हणून आम्ही ही योजना घोषित केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनाही ही योजना लागू होणार आहे. भाजप आणि अमित शहा आंबेडकरांची खिल्ली उडवत आहेत. आम्ही या योजनेद्वारे त्याला प्रत्युत्तर देत आहोत.”, असे देखील केजरीवाल यांनी सांगितले.

फेब्रुवारीमध्ये दिल्लीची निवडणूक

दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 23 फेब्रुवारीला संपत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच येथे विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल हे विविध योजना जाहीर करत आहेत.

केजरीवाल यांनी 12 डिसेंबर रोजी 60 वर्षांवरील वृद्धांना मोफत उपचार देण्याची घोषणा केली होती. तसेच महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT