
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर संपुर्ण जिल्हा दहशतीखाली आहे. ज्या पद्धतीने संतोषचा खून झाला ते पाहून काळजाला पीळ पडतो. आज आम्ही या घटनेबाबत बोलतोय, पण आम्हालाही टार्गेट केले जाऊ शकतं, अशी भिती बीडचे (Bajrang Sonawane) खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज मस्साजोग येथे येऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, दहशतीतून बाहेर पडा, आपण सगळे मिळून न्यायासाठी एकत्रित प्रयत्न करू असे सांगत (Sharad Pawar) शरद पवारांनी देशमुख कुटुंब आणि मस्साजोगमधील लोकांना दिलासा दिला. या घटनेच्या खोलपर्यंत जाऊन सुत्रधाराला शोधा असे आवाहनही शरद पवार यांनी केले होते. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
संतोष देशमुख यांच्या खूनाच्या घटनेने व्यथित झालेले सोनवणे यावेळी भावनिक झाले होते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी येत असताना काळजाला पीळ पडतो. त्यांची लहान मुलगीही आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करते. यावरून बीड जिल्ह्यात किती दहशतीचे वातावरण आहे हे दिसून येते. सर्व सामान्य नागरिकांनी जिल्ह्यात राहावे की इथून निघून जावे? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
संतोष देशमुख यांची हत्या आणि ती करताना आरोपींनी केलेला क्रूरपणा याबद्दल महिलांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यांनी या घटनेला जबादार सर्वांना शिक्षा करा, अशी मागणी केली आहे. एका कंपनीचे काम सुरु असताना तिथे झालेल्या मारहाणीतून हा प्रकार घडला. मात्र त्यानंतर पोलिसांनी काही केले नाही. आरोपींवर गुन्हा दाखल करून घेतल नाही. पोलीस यंत्रणेतील काही लोक यात सामील आहेत, असा आरोप सोनवणे यांनी यावेळी केला.
या घटनेनंतर मी बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात होतो, मात्र काही झालं नाही. एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि आरोपीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मस्साजोगच्या घटनेला तेरा दिवस झाले तरी मुख्य आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. मग मुख्यमंत्री या घटनेची पाळेमुळे कधी खणून काढणार? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला. बीड जिल्हा एवढा दहशतीखाली आहे की पोलीस यंत्रणा काय करते हा प्रश्न आहे.
संतोष देशमुख यांचे कुटुंब संरक्षण मागत आहे. आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींनाही फिरणे अवघड झाले आहे. आम्ही या घटनेबद्दल बोलतो, देशमुख कुटुंबाला न्याय मिळवा म्हणून झटतोच, पण यानंतर आम्हालाही टार्गेट केले जाऊ शकते, असेही सोनवणे म्हणाले. मस्साजोग घटनेचा खटला फास्टट्रॅकवर चालवला गेला पाहिजे. तसेच आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणीही सोनवणे यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.