Arvind Kejriwal  Sarkarnama
देश

Arvind Kejriwal Attack: दिल्लीतून खळबळजनक बातमी! माजी मुख्यमंत्री अन् 'आप'चे सर्वेसर्वा केजरीवालांवर हल्ला Video

AAP Political News : आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर यापूर्वीही अनेकदा हल्ले करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात त्यांच्यावर विकासपुरी भागात भाजपच्या लोकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा दावा मुख्यमंत्री आतिशी यांनी केला होता.

Deepak Kulkarni

Delhi News : दिल्लीत पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अरविंद केजरीवालांकडून (Arvind Kejriwal) पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच दिल्लीतून एक खळबळजनक माहिती घटना समोर येत आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे (AAP) नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात शनिवारी (ता.30)ही घटना घडली आहे.या घटनेत हल्लेखोरांकडून केजरीवालांवर एका व्यक्तीने द्रव फेकले.पण ते द्रव्य नेमकं शाई होते की पाणी याबाबत अद्यात खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.

याबाबत 'पीटीआय' या वृत्तसंस्थेनं वृत्त दिले आहे.त्यात दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी संबंधित हल्लेखोराला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले.तसेच आपच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला घटनास्थळी बेदम मारहाण केली.या घटनेची सुरक्षा कर्मचारी व पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

या हल्ल्यानंतर दिल्लीचं राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून आपकडून केंद्रातील भाजप सरकार गंभीर आरोप करण्यात आला आहे.यात दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भाजपचे नेते सर्व राज्यांमध्ये आमच्या रॅली काढतात, त्यांच्यावर कधीही हल्ला होत नाही. पण केजरीवाल यांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत. याचवेळी त्यांनी दिल्लीतील आजचा केजरीवालांवरील हल्लासुध्दा भाजपनेच घडवून आणल्याचा आरोप आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

यापूर्वीही अनेकदा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात त्यांच्यावर विकासपुरी भागात भाजपच्या लोकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा दावा मुख्यमंत्री आतिशी यांनी केला होता. मार्च 2022 मध्ये गुजरात दौऱ्यावर असताना त्यांच्यावर प्लास्टिकची बाटली फेकण्यात आली होती. 2019 ला दिल्लीतच रोड शो दरम्यान थप्पड मारण्यात आली होती.

तसेच नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्ली सचिवालयात केजरीवालांवर लाल मिरची फेकण्याचा प्रयत्न झाला होता. 2016 मध्ये जानेवारी महिन्यात केजरीवाल यांच्यावर शाई फेक करण्यात आली होती. त्यापूर्वी दिल्लीतील सुलतानपुरी येथे रोड शोदरम्यान केजरीवालांना थप्पड मारण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT