Gujrat Politics| CM Arvind Kejariwal|
Gujrat Politics| CM Arvind Kejariwal| 
देश

Gujrat Politics| गुजरात दौऱ्यात अरविंद केजरीवालांवर हल्ला...

सरकारनामा ब्युरो

गुजरात : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejariwal) गुजरात दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. नवरात्रीनिमित्त आयोजित एका गरबा कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सहभागी झाले होते. मात्र या कार्यक्रमात कोणीतरी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अंगावर पाण्याची बॉटल फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटमधील खोडलधाम गरबा कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते, त्यांनी नील सिटी क्लबच्या दांडिया कार्यक्रमात गरब्यातही सहभाग घेतला. अरविंद केजरीवाल खोडलधाम गरबा कार्यक्रमात त्यांच्यावर कोणीतरी पाण्याची बाटली फेकली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. मात्र, केजरीवाल यांच्यावर बाटली फेकणारी व्यक्ती कोण होती, हे समजू शकले नाही.

दरम्यान, गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी गांधीधाम आणि जुनागडमध्ये जाहीर सभांना संबोधित केले.'' गुजरातच्या जनतेला 27 वर्षे पर्याय नव्हता, पण यावेळी आम आदमी पार्टी हा पर्याय आहे आणि आता गुजरातमध्ये बदल होणार आहे. गुजरातची जनता 27 वर्षांपासून त्यांना सहन करत आहे. आता त्यांचा अहंकार मोडण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितलं.

याचवेळी त्यांनी भाजप आणि कॉंग्रेसवरही गंभीर आरोप केले. सरकारी अहवालाचा संदर्भ देत केजरीवाल म्हणाले की, गुजरातमध्ये प्रचंड बहुमताने आपचे सरकार स्थापन होणार आहे. हे कळताच हे लोक वेडे झाले आहेत. त्यांनी चौफेर गुंडगिरी सुरू केली असून लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. काहीही झाले तरी 'आप'चे सरकार येऊ नये, यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या गुप्त बैठका सुरू आहेत. 'आप'चे सरकार आल्यास लूट थांबेल आणि सर्व पैसा शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी जाईल, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

गुजरातमधील जुनागढ येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपच्या 'अच्छे दिन' घोषणेचा खरपूस समाचार घेत मान म्हणाले की, तुमचे अच्छे दिन आले की नाही हे मला माहीत नाही, पण डिसेंबरनंतर केजरीवालजींचे खरे दिवस येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री मान यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT