धक्कादायक! फुटबॉल सामन्यादरम्यान फॅन्समध्ये हाणामारी; १२७ जणांचा झाला मृत्यू

Indonesia : या चेंगराचेंगरी आणि हिंसाचारात 2 पोलिसांनाही आपला जीव गमवावा लागला.
Indonesia News
Indonesia News Sarkarnama

जकार्ता : खेळ हा अनेकांना एकत्र आणतो. पराभव आणि विजय देखील पचवायला शिकवत असतो. मात्र, याच खेळाच्या इंडोनेशियातील फुटबॉलच्या मैदानात मृत्यूच तांडव बघायला मिळालं आहे. इंडोनेशिया येथील फुटबॉल सामन्यादरम्यान झालेला गोंधळ आणि हिंसाचारात 127 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामध्ये दोन पोलिसांचा देखील मृत्यू झाला आहे. (Indonesia Football Match)

Indonesia News
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा पुण्यात मृत्यू

अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात झालेल्या या सामन्यात अरेमाचा संघ पराभूत होताच, त्याच्या हताश समर्थकांनी मैदानावर गोंधळ घातला. स्टेडियममधील चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलीस पुढे गेले. मात्र, त्यांनाही ते थांबवता आलं नाही. स्टेडियममध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या इतरांचा मृत्यू रुग्णालयात झाला.

न्यूज एजन्सी एएफपीनं पोलिसांच्या हवाल्यानं सांगितलं की, पूर्व जावा येथील एका स्टेडियममधील सामन्यातील पराभवामुळं निराश झालेल्या प्रेक्षकांनी फुटबॉल खेळपट्टीवरच गोंधळ घातला. या चेंगराचेंगरी आणि हिंसाचारात 2 पोलिसांनाही आपला जीव गमवावा लागला. स्टेडियममध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 127 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त मिळत आहे. तर जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Indonesia News
सगळेच आनंद दिघे नसतात,काही शिंदे असतात; 'सामना'तून एकनाथ शिंदेंची पोलखोल...

स्थानिक मीडियातील रिपोर्टनुसार, ही घटना पूर्व जावाच्या मलंग भागातील कंजुरुहान स्टेडियममध्ये घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये लोकांनी सीमा ओलांडून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून येतयं. स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. मात्र स्टेडियममधील गोंधळ काही वेळात थांबला, मात्र संतप्त लोक रस्त्यावर आले आहेत. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

दरम्यान, याबाबत पीटी लीगा इंडोनेशिया बारूचे अध्यक्ष अखमद हदियन लुकिता यांनी या घडनेबाबत दु:ख व्यक्त केले असून आम्ही या घडनेमुळे चिंतीत आणि दु:खी आहोत. या घटनेमधून आम्हा सर्वांसाठी एक धडा मिळेल, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, असे मत व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com