Arvind Kejriwal Case Update Sarkarnama
देश

Arvind Kejriwal Case Update : न्यायालयाचा पुन्हा दणका; केजरीवालांच्या अडचणी संपेना...

Delhi Political News : मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अटक आणि कोठडी बेकायदेशीर ठरवत तात्काळ सुटकेसाठी याचिका दाखल केली होती.

Chetan Zadpe

Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कथित दारू घोटाळ्यात केजरीवालांना अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 28 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे. यातून सुटका व्हावी म्हणून आज शनिवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ल उच्च न्यायालयात धाव घेतली.

उच्च न्यायालायात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी ईडीची अटक आणि ईडीची कोठडी दोन्ही बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. यावर केजरीवालांनी 24 मार्चपर्यंत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी फेटाळत न्यायालयाने केजरीवालांना पुन्हा दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या सुटकेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. (Latest Marathi News)

केजरीवालांना धक्का -

आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आणि ईडीच्या कोठडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने या प्रकरणी केजरीवाल यांच्या याचिकेची तात्काळ सुनावणी वा यादी करण्यास नकार दिला. हा खटला बुधवारी (होळीच्या सुट्टीनंतर) पुन्हा उघडण्यासाठी यादीत समाविष्ट केला जाईल.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अटक आणि कोठडी बेकायदेशीर ठरवत तात्काळ सुटकेसाठी याचिका दाखल केली होती. आज (शनिवार) सायंकाळपर्यंत किंवा उद्या (२४ मार्च) सुनावणी घेण्याची मागणी त्यांची मुख्य मागणी होती. मात्र या प्रकरणावर थेट 27 मा मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

27 मार्च रोजी सुनावणी होऊ शकते -

उच्च न्यायालयाने या सुटकेच्या केजरीवालांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण बुधवारी पुन्हा सुरू करण्यासाठी यादीत समाविष्ट केले जाईल. याच दिवशी या प्रकरणावर सुनावणीदेखील होऊ शकते. ईडीने न्यायालयाकडे केजरीवाल यांच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना 6 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. 28 मार्च रोजी केजरीवालांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

आपचे कार्यालय जप्त : अतिशी

आपचे नेते आणि मंत्री आतिशी यांनी आप कार्यालय जप्त केल्याचा दावा केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांकडून आप कार्यालय सील केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. गर्दी रोखण्यासाठी पोलिस (Police) तैनात करण्यात आले होते, कारण तेथे कलम 144 लागू आहे, असे पोलिसांना सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT