Nanded BJP News : चिखलीकर- चव्हाण यांच्या लढतीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला

Ashok Chavan चिखलीकरांच्या विजयाची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर टाकण्यात आली आहे. असे असले तरी चिखलीकर स्वतंत्रपणे आपल्या प्रचाराची यंत्रणा राबवत आहेत.
Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikar
Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikarsarkarnama
Published on
Updated on

Nanded News : नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने महाविकास आघाडीकडून माजी आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. त्याआधीच भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाची घोषणा केली होती. अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यापूर्वी त्यांचे वसंत चव्हाण यांच्याशी चांगले संबंध होते, तर प्रताप पाटील चिखलीकर हे कट्टर विरोधात म्हणून ओळखले जायचे. मात्र, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर हे समीकरण आता बदलले आहे.

अनेक वर्षे सोबत काम केलेल्या वसंत चव्हाण यांना पराभूत करून ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्या चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी चव्हाण यांना आता प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. चिखलीकरांच्या विजयाची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर टाकण्यात आली आहे, असे असले तरी प्रताप पाटील चिखलीकर स्वतंत्रपणे आपल्या प्रचाराची यंत्रणा राबवत आहेत. अशोक चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना भाजपमध्ये आणून पक्षाला अतिरिक्त बळ देण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या राजकीय खेळीचा जवळून अनुभव घेतलेल्या माजी आमदार वसंत चव्हाण यांनाच उमेदवारी देत भाजपला चेकमेट देण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीसाठी नांदेडची लढाई सोपी नसणार आहे. परंतु, लढाई आधीच शस्त्र टाकून न देता निकराने झुंजण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने वसंत चव्हाण यांच्या माध्यमातून केला आहे. काॅंग्रेसचा हात अशोक चव्हाण यांनी सोडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कसोटी लागणार आहे.

Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikar
Ashok Chavan on Rahul Gandhi: राहुल गांधींचे ते विधान चुकीचं; अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

काॅंग्रेस कठीण परिस्थितीत असताना नांदेडच्या जागेवर वसंतराव चव्हाण निवडून आले तर याची चर्चा देशपातळीवर होणार आहे. काॅंग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांची राजकीय कारकीर्द नायगावचे सरपंच म्हणून सुरुवात झाली. त्यांनी सरपंच म्हणून 24 वर्षें काम पाहिले आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, नांदेड जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, एकदा विधान परिषद सदस्य, दोन वेळा आमदार राहिले आहेत.

वसंतराव चव्हाण यांचा नायगाव विधानसभा मतदारसंघ, देगलुर -बिलोली, मुखेड या तीन मतदारसंघांत चांगला जनसंपर्क आहे. या भागात गेल्या निवडणुकीत चिखलीकर यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. वसंतराव चव्हाण याच भागातील उमेदवार असल्याने चिखलीकरांना या भागात लक्ष द्यावे लागणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चिखलीकर यांचीही राजकीय कारकीर्द चिखली या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाली आहे.

Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikar
Vasant Chavan: नांदेडमधून आणखी एक चव्हाण दिल्लीला जाणार? चिखलीकर विरुद्ध चव्हाण

ते दोन वेळा आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नांदेड जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच ते विद्यमान खासदार होते. त्यांनी गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. या वेळी या निवडणुकीत त्यांना अशोक चव्हाणांची साथ मिळणार आहे. काॅंग्रेस व भाजपचे उमेदवार तुल्यबळ आहेत. ही लढत जरी वसंतराव चव्हाण व चिखलीकर यांच्यात होत असली तरी खरी कसोटी अशोक चव्हाण यांची लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikar
‘मी भाजप विरोधात बोलणारच’, प्रणिती शिंदेंनी शड्डू ठोकला | Praniti Shinde | Congress |

भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाणांना पक्षाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत खासदार केले. त्यामुळे त्यांना परतफेड म्हणून चिखलीकरांना निवडून आणावे लागणार आहे. भाजपच्या जिल्ह्यातील निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आता जुनं सगळं विसरावं, असे आवाहन अशोक चव्हाण प्रवेश सोहळ्यातून करताना दिसत आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

Vasant Chavan, Ashok Chavan, Pratap Patil-Chikhalikar
Nanded Congress News : भाजपच्या चिखलीकरांविरोधात नांदेडमध्ये काँग्रेसकडून चव्हाणच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com