AAP and Delhi Vidhan Sabha Election : दिल्लीत निवडणूक प्रचार संपला आहे. या दरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांना आम आदमी पार्टीला मिळणाऱ्या जागांबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार या निवडणुकीत आम आदमी पार्टीला 55 जागा मिळणार आहेत. तसेच केजरीवालांनी हेही सांगितले की, जर महिलांनी जोर लावला आणि सर्वजणी मतदानास गेल्या तसेच आपल्या पुरुषांनाही आम आदमी पार्टीला मत देण्यासाठी समजावलं तर 60 पेक्षाही अधिक जागा येऊ शकतात.
कालकाजी विधानसभा मतदारसंघातील रोड शो दरम्यान आम आदमी पार्टीचे(AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, आम्ही 55 जागा जिंकत आहोत. परंतु माझ्या माता-भगिनींनी साथ दिली तर आम्ही 60 जागांपर्यंत पोहचू शकतो. मी माझ्या माता-भगिनींना आवाहन करतो की, त्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुषांना समजवावे की भाजपमध्ये काहीच नाही. तो श्रीमंतांचा पक्ष आहे, केवळ केजरीवालच कामी येणार आहेत. ही निवडणूक महिलांची आहे. जर महिलांनी योगदान दिले तर आम्ही 60 पेक्षा जास्त जागा जिंकू.
केजरीवाल यांनी हेही सांगितले की, भाजप(BJP) दावा करत होती की आम आमदी पार्टीला तीन जागांवर फटका बसणार आहे. ज्यात नवी दिल्ली, जंगपुरा, कालकाजी मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र या जागांवर आम आदमी पार्टी ऐतिहासिक फरकाने विजय मिळवणार आहे.
अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी मतदारांना आवाहन करत म्हटले की, ''मी दिल्लीच्या जनतेला सांगू इच्छतो की मला सूत्रांकडून समजले आहे, की भाजप मशिनींद्वारे दहा टक्के मतांध्ये गडबड करू शकते. मात्र तुम्ही एवढ्या मोठ्याप्रमाणात मतदान करा की प्रत्येक मत आम आदमी पार्टीला जाईल. अशाप्रकारे जर आपल्याला 15 टक्क्यांची आघाडी मिळाली, तर आपण 5 टक्क्यांनी विजयी होवू. आपल्याला प्रत्येक जागेवर दहा टक्क्यांपेक्षा अधिकची आघाडी मिळवू द्यावी. मशीनीस पराभूत करण्याचा हाच एकमेवळ पर्याय आहे, तुम्ही मोठ्यासंख्येने मतदान करा.''
तसेच, ''आम्ही दक्षता म्हणून एक वेबसाइट बनवली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीतून धडा घेत आम्ही निर्णय घेतला आहे की, 5 फेब्रुवारी रोजी रात्री आम्ही प्रत्येक मतदान केंद्राच्या सहा डिटेल्स अपलोड करू, जेणेकरून मशिनींशी छेडछाड केली जावू नये. जर मतदानाच्या दिवशी मशींनीमुळे काही गडबड झाली, तर तुम्ही आकडेवारी जुळवून बघू शकता.'' असंही केजरीवालांनी म्हटलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.