
PM Narendra modi reply to the Motion of Thanks on the Presidents Address : पंतप्रधान मोदी यांनी आज(मंगळवारी) संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना टोला लगावल्याचे दिसून आले. ''जे लोक गरिबांच्या झोपडीत फोटोसेशन करून आपलं मनोरंजन करतात त्यांना संसदेत गरिबांचं बोलणं बोरिंगच वाटणार.'' असं म्हणत मोदींनी म्ह्टलं.
कारण, राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी बोरिंग असा उल्लेख केला होता. तर सोनिया गांधी यांनी 'बिचारी महिला' असा उल्लेख केला होता. यानंतर सत्ताधारी भाजपने सोनिया गांधी आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. त्यात आता पंतप्रधान मोदींनीही त्यांना टोला लगावल्याचे दिसत आहे.
संसदेत बोलताना पंततप्रधान मोदी(PM Modi) म्हणाले, मागील दहा वर्षांत देशाच्या जनतेने आम्हाला सेवेची संधी दिली. २५ कोटी देशवासी गरिबातून बाहेर आलेत. पाच-पाच दशकापर्यंत गरिबी हटाव हे नारे ऐकले होते आणि आता २५ कोटी गरीब गरिबीला पराभूत करून गरिबीतून बाहेर पडले आहेत. ते असेच नाही. योजनाबद्धरित्या समर्पित भावाने आपलेपणाच्या पूर्ण संवेदनशीलतेसह जेव्हा गरिबांसाठी आयुष्य घालवतो तेव्हा हे होतं.
जेव्हा जमिनीशी निगडीत लोक, जमिनीची वास्तविकता जाणून जमिनीवर जीवन जगतात. तेव्हा जमिनीवर बदल नक्कीच होतो. आम्ही गरिबांना खोटे नारे दिले नाहीत. आम्ही खरा विकास दिला. गरिबांचे दु:ख, सर्वसामान्यांच्या अडचणी, सर्वसामान्य वर्गाची स्वप्न अशीच नाही समजली जात. यासाठी एक आवड लागते.
'आधी वर्तमानपत्राचे मथळे असाचे की, इतक्या लाखांचे घोटाळे....मात्र दहा वर्ष झाली आहेत, घोटाळे न झाल्याने देशाचे लाखो, करोडो रुपये वाचले आहेत, जे जनतेच्या सेवेसाठी लावले जात आहेत. आम्ही जी विविध पावलं उचलली, त्याने लाखो करोडो रुपयांची बचत झाली. परंतु त्या पैशांचा वापर आम्ही शीशमहल बनवण्यासाठी नाही केला, त्या पैशांचा वापर आम्ही देश घडवण्यासाठी केला.'' असंही मोदींनी म्हटलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.