Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : भाजपकडून ऑफर, पक्षात आल्यास सोडून देऊ! केजरीवालांनी फोडला बॉम्ब

Rajanand More

New Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी बॉम्ब फोडला. भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पक्षात आल्यास सोडून देऊ, असेही केजरीवालांनी म्हटले आहे. केजरीवालांच्या या दाव्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. आपमधील आमदारांना फोडण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप आपने केला आहे. (Arvind Kejriwal News)

आपच्या (AAP) आमदारांना पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आपच्या नेत्या व मंत्री आतिशी यांनी केला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. आपचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून (BJP) 25-25 कोटी रुपये आणि पुढील निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन भाजपकडून दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.

यापार्श्वभूमीवर बोलताना आज केजरीवाल म्हणाले, त्यांनी कितीही षडयंत्र रचले तरी आम्हाला काही होणार नाही. त्यांच्याविरोधात मी उभा आहे. मीही झुकणार नाही. आम्ही कोणते चुकीचे काम केले आहे. शाळा, रुग्णालय, रस्ते अशी कामे करत आहोत. आम्हाला जेलमध्ये पाठवले तरी दिल्ली सरकारची विकासकामे थांबणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनीष सिसोदियांना तुरुंगात टाकले, कारण त्यांनी शाळा चांगल्या केल्या. सत्तेंद्र जैन यांनी मोहल्ला क्लिनिक सुरू केल्याने त्यांना जेलमध्ये टाकले. त्यांनी ईडी, सीबीआय अशा सर्व केंद्रीय तपास यंत्रणांना आप नेत्यांच्या मागे सोडले आहे, अशी टीका केजरीवालांनी केली.

आम्ही त्यांच्या पक्षात यावे, असे भाजपला वाटत आहे. भाजपमध्ये आला तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ, असे ते म्हणतात. भाजपमध्ये कधीच येणार नाही, असे मी त्यांना सांगितले. भाजपमध्ये काय जायचे? भाजपमध्ये गेलो तर सर्व गुन्हे माफ, असा टोलाही केजरीवालांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT