Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : केजरीवाल यांच्यावरील याचिकेचा फैसला 17 जुलैला ; दिल्ली उच्च न्यायालयाची सीबीआयला नोटीस

Arvind Kejriwal Arrest News : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर यापूर्वीच तिहारमध्ये दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sachin Waghmare

New Dehli News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध मद्य धोरण प्रकरणातील भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. या प्रकरणी सीबीआयने 26 जून रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर यापूर्वीच तिहारमध्ये दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी सीबीआयला नोटीस बजावली असून 7 दिवसांत उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जुलैला होणार आहे.

उच्च न्यायालयात केजरीवाल यांच्या वतीने सोमवारी याचिका दाखल करण्यात आली होती. केजरीवाल यांनी राऊस एव्हेन्यू कोर्टाच्या 26 जूनच्या आदेशालाही आव्हान दिले आहे. ज्याअंतर्गत त्यांना तीन दिवसांच्या सीबीआय (CBI) कोठडीत पाठवले होते. सध्या केजरीवाल 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. केजरीवाल यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.

त्यापैकी पहिला गुन्हा ईडीचा आहे, ज्यामध्ये त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. दुसरा सीबीआयचा आहे, जो दारू धोरणातील भ्रष्टाचाराबाबत नोंदवला गेला होता.

या प्रकरणी केजरीवाल यांना 26 जून रोजी पुन्हा अटक करण्यात आली होती. दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या विरोधात दोन्ही गुन्हे स्वतंत्रपणे नोंदवण्यात आले आहेत.

त्यामुळे त्यांना अटकही करण्यात आली आहे. ईडी प्रकरणातील केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 3 जुलैला संपणार आहे. 26 जून रोजी सीबीआयने केजरीवाल यांना न्यायालयात हजर केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT