Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : ठरलं! केजरीवाल उद्याच राजीनामा देणार ; उपराज्यपालांच्या भेटीची वेळही ठरली

Aam Aadmi Party politics : तर दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या गोटात नवीन मुख्यमंत्र्यासाठी हालचालींना वेग आलेला दिसत आहे.

Mayur Ratnaparkhe

Arvind Kejriwal will meet Lt Governor : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराज्यपाल व्ही.के.सक्सेना यांना भेटीसाठी वेळ मागितला होता. त्यांना उद्या(मंगळवार) साडेचार वाजता भेटीसाठीची वेळ मिळाली आहे. त्यामुळे आता केजरीवाल उद्या उपराज्यपालांची भेट घेवून राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या गोटात नवीन मुख्यमंत्र्यासाठी हालचालींना वेग आलेला दिसत आहे. उद्या केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाचीही घोषणा होवू शकते.

दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल, यवरून अेक नावांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आतिशी, सौरभ भारद्वाज आणि राघव चड्ढा यांची नावं स्पर्धेत आघाडीवर मानली जात आहेत. मात्र अद्याप तरी कोणतेही नाव निश्चित झआलेले नाही.

अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा रविवारी केली होती. त्यांनी म्हटले होते की दोन दिवसांमध्ये ते राजीनामा देतील. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्ष मुख्यालयातच केजरीवालांनी ही घोषणा केली होती. केजरीवाल म्हणाले होते की, मी आता जनतेच्या न्यायालयात आलो आहे, जनताच ठरवेल मी भ्रष्टाचारी की प्रामाणिक. जोपर्यंत जनता निर्णय़ देणार नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही.

याशिवाय केजरीवाल असंही म्हणाले होते की, मी दोन दिवसांनंतर राजीनामा देईल आणि लोकांना विचारले की मी प्रामाणिक आहे की नाही?, मी जनतेला आवाहन करू इच्छितो की जर तुम्हाला वाटत असेल की केजरीवाल प्रामाणिक आहे, तर मला मत द्या. जर तुम्हाला वाटत असेल केजरीवाल दोषी आहे तर मला मत देवू नका. तुमचं प्रत्येक मत माझ्या प्रामाणिकपणाचं प्रमाणपत्र असेल.

दिल्लीत पुढील वर्षात फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. कारण, दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षात 23 फेब्रुवारी रोजी संपणार आहे आणि निवडणूक प्रक्रिया फेब्रुवारीच्या प्रारंभी सुरू होण्याची शक्यता आहे. तर केजरीवालांसह आतिशी आणि आम आमदी पार्टीच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे की दिल्लीत निर्धारित वेळेआधीच विधानसभा निवडणूक घेतली जावी.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT