Anna Hazare on Arvind Kejriwal : केजरीवालांची मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा अन् अण्णा हजारेंची खास प्रतिक्रिया, म्हणाले..

Arvind Kejriwal Resignation announcement : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर भाजपनेही निशाणा साधलेला आहे, जाणून घ्या नेमकं कोण काय म्हणालं आहे?
Anna Hazare on Arvind Kejriwal
Anna Hazare on Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Anna Hazare on Kejriwal Resignation announcement : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. ज्यावरून आता राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपने केजरीवालांच्या या निर्णयावर निशाणा साधला आहे. तर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचीही केजरीवालांच्या या घोषणेवर खास प्रतिक्रिया समोर आली आहे.

अण्णा हजारेंनी(Anna Hazare) म्हटले आहे की, 'मी आधीच सांगत होतो की, राजकारणात जावू नका. समाजाची सेवा करा, फार मोठे व्यक्ती बनाल.'

तसेच अण्णा हजारे यांनी हेही म्हटले की, 'अनेक वर्ष आम्ही सोबत होतो. त्या वेळी मी त्यांना वारंवार सांगितले की राजकारणात जायचं नाही. समाजसेवा आपल्या आयुष्यात आनंद देते. त्या आनंदातच रहा, परंतु त्यांच्या मनात ही गोष्ट राहिली नाही आणि आज जे व्हायचं होतं ते झालं, त्यांच्या मनात काय आहे मला काय माहीत?

Anna Hazare on Arvind Kejriwal
BJP on Arvind Kejriwal : 'लालू-राबडी मॉडेलनुसार अरविंद केजरीवालांना पत्नीला बनवायचंय मुख्यमंत्री' ; भाजपचा निशाणा!

भाजपने काय म्हटलं आहे? -

भाजप(BJP) नेते शहजाद पूनावाला म्हणाले, 'अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्यास दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे. जेणेकरून ते आपल्या आमदारांना सुनीता केजरीवाल यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यासाठी भाग पाडू शकतील. तसेच पूनावाला यांनी एक्सवर लिहिले की, लालू-राबडी मॉडल, सोनिया-मनमोहन मॉडल नुसार संपूर्ण सत्ता हवी, परंतु कोणासही उत्तर देण्यास बांधील नकोय. त्यांनी म्हटले की, माझ्या ट्वीटनंतर आम आदमी पार्टी मागे हटण्याची शक्यता आहे.'

Anna Hazare on Arvind Kejriwal
Rahul Gandhi : 'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी, त्यांच्यावर तर..' ; केंद्रीयमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य!

केजरीवाल नेमकं काय म्हणाले आहेत? -

अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) म्हणाले, "मी आता जनतेच्या न्यायालताय आलो आहे. तुम्ही मला गुन्हेगार मानता की इमानदार? आता मी दोन दिवसात मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देत आहे. मी प्रत्येक घराघरात आणि गल्लीबोळात जाईन, जोपर्यंत जनतेचा निकाल येत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही."

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com