Narendra Modi Amit Shah Arvind Kejriwal sarkarnama
देश

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांचा पुन्हा एकदा भाजपला 'जोर का झटका'; दगाबाजी होऊनही विजय खेचून आणला

AAP wins MCD mayor election BJP loses by 3 votes: दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीला आता तीन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे.सत्ताधारी आम आदमी पक्षाकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Deepak Kulkarni

Delhi News : एकीक़डे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याचदरम्यान, आत आम आदमी पक्षाने भाजपला मोठा धक्का दिल्याचं समोर येत आहे.दिल्लीत आपला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली एमसीडीवर पुन्हा एकदा 'आप'ने (AAP) झेंडा रोवला आहे. भाजप उमेदवाराचा महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत अवघ्या ३ मतांनी पराभव झाला आहे.

दिल्ली महापालिकेची महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक गुरुवारी(ता.14) पार पडली. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी २६५ मतं पडली. पण त्यापैकी २ मतं अवैध ठरली. यात आपचे उमेदवार महेश खींची यांना 133 तर भाजपाच्या (BJP) किशन लाल यांना 130 मतं मिळाली. त्यामुळे किशन लाल यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष बाब म्हणजे दिल्लातील निवडणुकीत काँग्रेसनं मतदानावर बहिष्कार टाकत तटस्थपणाची भूमिका घेतली होती.तर आपच्या काही नगरसेवकांनी थेट भाजपाला मतदान केलं.दिल्ली महापालिकेत काँग्रेसच्या 7 नगरसेवकांनी बहिष्कार तर आपच्या 10 जणांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर दिल्लीत पुन्हा एकदा महापौर निवडून आला आहे. या निवडणुकीसाठी राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल याही अनुपस्थित होत्या.

आपचे नवे महापौर महेश खींची यांना अवघ्या पाच महिन्यांचा इतका कमी कार्यकाळ मिळणार आहे. दिल्ली महापालिकेत दर वर्षाला महापौर निवडणूक प्रक्रिय राबवली जाते.ही निवडणूक खरंतर एप्रिल 2024 मध्ये पार पडणार होती.मात्र, पीठासीन अधिकारी ठरवण्याच्या फाईलवर तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असल्याने ते सही करू शकले नव्हते.त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती.

दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीला आता तीन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे.सत्ताधारी आम आदमी पक्षाकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सार्वजनिक सभा आणि दौरे, मेळावे, भेटीगाठी यांनी राजकीय वातावरण तापवलं आहे.

आप नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मोठे संकेत दिले आहेत. त्यात अनेक विद्यमान आमदारांची तिकीटे कापले जाण्याची शक्यता आहे.ही निवडणूक आपसाठी अतिशय आव्हानात्मक असणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी महापौर निवडणूक होणार आहे. आताच्या निवडणुकीत काठावर सत्ता आल्याने आपसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT