Shivsena News : एक कोटींचं आश्वासन अन् मतांची 'डिमांड'; शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मनसेनं उचललं मोठं पाऊल

Political News : निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने मोठी ताकद लावल्याने चुरस वाढली आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
raj thackeray eknath shinde
raj thackeray eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. निवडणूक प्रचारासाठी अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने मोठी ताकद लावल्याने चुरस वाढली आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

त्यातच आता मागठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे. त्यांनी निवडणूक काळात भाषण करताना लोहार, सुतार समाजासमोर एक कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले असून हा प्रकार त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

raj thackeray eknath shinde
Goa CM Pramod Sawant : 'उध्दव ठाकरे यांच्या स्वार्थामुळे...' ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साधला निशाणा!

आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी एका प्रचार सभेत भाषण करताना लोहार, सुतार समाजासमोर एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे भाषण करताना लोहार, सुतार समाजासमोर एक कोटी रुपये देण्याचे आश्वासन देऊन आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

raj thackeray eknath shinde
Uddhav Thackeray : 'अदानींसाठी जमिनी शोधत होते, केसरकर पडल्यानंतरच सिंधुदुर्गचं चांगलं होईल'; ठाकरेंचा घणाघात

आमदार सुर्वें यांनी आचारसंहिता भंग केली असून याबाबतचे लेखी तक्रार मागठाणे विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे. त्यांनी मतदाराना पैशाचे आमिष दाखवून आचारसंहिता भंग केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात, मनसेचे मागठाणे येथील उमेदवार नयन प्रदीप कदम यांचे प्रचार प्रमुख प्रदीप कदम यांनी केली आहे.

raj thackeray eknath shinde
Nitin Gadkari : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा परतणार का ? भाजपच्या नितीन गडकरींचं मोठं विधान

आमदार सुर्वें यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात या प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर मागठाणे विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

raj thackeray eknath shinde
Vinod Tawade : महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी नवी नावंही येऊ शकतात; विनोद तावडेंचं सूचक विधान, चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com