Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejrival News : तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांचं मोठं भाकीत; मोदींनंतरचा पंतप्रधानच सांगून टाकला

Sachin Waghmare

Delhi News : गेल्या काही दिवसापासून हे इंडिया आघाडीला विचारतात तुमचा पंतप्रधान कोण ? मी भाजपला विचारतो तुमचा पुढचा पंतप्रधान कोण ? पुढच्या वर्षी १७ सप्टेंबरला पीएम नरेंद्र मोदी रिटायर्ड होणार आहेत. मग पुढचा पंतप्रधान कोण ? असा सवाल करीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला धारेवर धरले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांना संपवून हे केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Saha) यांना पुढचा पंतप्रधान बनवतील. नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्यांच्यासाठी नाही तर अमित शाह यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मत मागत आहेत. मोदींच्या नावाने मत देणाऱ्यांनी विचार करून मत द्या, तुम्ही मोदींना नाही तर शाह यांच्यासाठी मत देत आहात, असेही यावेळी केजरीवाल म्हणाले. (Arvind Kejrival News)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर टीका केली. दिवसात २४ तास असतात पुढचे २१ दिवस ३६ तास काम करून दाखवणार आहे. माझे आकलन आहे की ४ जूननंतर यांचे सरकार बनत नाही. अनेक राज्यात यांच्या जागा कमी होत आहेत. एकाही राज्यात यांच्या जागा वाढत नाहीत, २२० ते २३० च्या आसपास यांच्या जागा येतील. केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार असेल, असा दावा यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

माझ्यासाठी मुख्यमंत्रीपद कधीच महत्वाचं नाही. इतिहासात आजपर्यंत एवढ्या जागा जिंकून एकदाही सरकार बनल नाही. भाजपने खोटं षडयंत्र रचून मला जेलमध्ये टाकले त्यामुळं मी राजीनामा दिला नाही, असेही यावेळी केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकशाहीला तुम्ही जेलमध्ये बंद करू शकत नाहीत. त्यामुळं मी जेलमधून लोकशाही चालवून दाखवणार आहे. मी दिल्लीच्या जेलमध्ये राहून सरकार चालवून दाखवणार आहे. हेमंत सोरेन यांनीही राजीनामा द्यायला नको होता, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

SCROLL FOR NEXT