Telangana News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून प्रचारसभेत सातत्याने देशातील 22 उद्योगपतींचा उल्लेख केला जातो. मागील काही महिन्यांपर्यंत त्यांच्या भाषणांमध्ये सातत्याने उद्योगपती गौतम अदानींचे नाव असायचे. पण सध्या त्यांचा नावाचा उल्लेख न करता राहुल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली जात आहे. तोच धागा पकडून बुधवारी मोदींनी राहुल यांच्यावर जोरदार प्रहार केला.
तेलंगणातील करीमनगर येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारसभेत मोदींनी थेट अदानी-अंबानींचे नाव घेत काँग्रेसवर (Congress) वार केला. अचानक अदानी-अंबानींचे नाव घेणे का बंद केले?, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. आता त्यांनी अदानी-अंबानीना शिव्या देणं बंद केलं आहे, असे मोदी म्हणाले. (Latest Political News)
काँग्रेसचे शहजादे मागील पाच वर्ष सकाळी उठताच जप सुरू करत होते. राफेल प्रकरण संपल्यानंतर त्यांनी नवा जप सुरू केला. पाच वर्ष एकच जप सुरू होता, पाच उद्योगपती... पाच उद्योगपती. त्यानंतर अदानी-अंबानीचा जप सुरू झाला. पण जेव्हापासून निवडणूक जाहीर झाली आहे, त्यांनी अदानी-अंबानीला शिव्या देणं बंद केलं आहे, अशी टीका मोदींनी केली.
लोकसभा निवडणुकीत अदानी-अंबानीकडून किती माल घेतला, हे राहुल गांधींनी घोषित करावे, असा आव्हान मोदींनी दिले. काळ्या पैशांची किती पोती मिळाली. काँग्रेसला टेम्पो भरून पैसे पोहचले आहेत का? तुम्ही एका रात्रीत अदानी-अंबानीला शिव्या देणं बंद केलं आहे. नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. पाच वर्ष शिव्या दिल्या अन् रात्रीत बंद केल्या. म्हणजे काही ना काही चोरीचा माल टेम्पो भरून मिळाला आहे. याचे उत्तर देशाला द्यावे लागेल, असे मोदी म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्याकडून बहुतेक प्रचारसभांमध्ये 22 उद्योगपतींकडे असलेल्या संपत्तीचा उल्लेख केला जात आहे. त्यांच्याकडे असलेली संपत्ती देशातील 90 कोटी जनतेकडे असलेल्या संपत्तीएवढी असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, ते अदानी-अंबानींचे नाव घेताना दिसत नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.