Brijbhushan Singh Sarkarnama
देश

Brijbhushan Singh: ब्रिजभूषण सिंह यांचं थेट मोदी-शाहांना आव्हान?; 2024 च्या लोकसभेसाठी स्वतःच्या उमेदवारीची केली घोषणा

सरकारनामा ब्यूरो

Political News: भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी महिला कुस्तीपटूंनी आंदोलनही केलं.

महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे अडचणीच आलेले ब्रिजभूषण सिंह यांनी आता आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणाच केली आहे. 2024 ची लोकसभेची निवडणूक आपण कैसरगंज मतदारसंघातून लढणार आहोत, असं म्हणत त्यांनी स्वतःची उमेदवारीच जाहीर करून टाकली आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

ब्रिजभूषण सिंह यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःची उमेदवारीच जाहीर करून टाकल्याने त्यांनी एक प्रकारे भाजपला आव्हानच दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपने अद्याप 2024 च्या लोकसभेसाठी कुणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही.

तसेच आगामी निवडणुकीत उमेदवारांबाबतही काही भाष्य केलेले नाही. मात्र, असे असतानाही ब्रिजभूषण सिंह यांनी आपण 2024 च्या लोकसभेची निवडणूक कैसरगंज मतदारसंघातून लढणार आहोत, असं सांगत थेट स्वतःची उमेदवारीच जाहीर केल्याने त्यांनी मोदी-शाहांना एक प्रकारचे आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांनी केलेल्या या घोषणेबाबत भाजपकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आगामी काळात भाजपचे हायकमांड ब्रिजभूषण सिंह यांच्या या घोषणेबद्दल काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT