Brij Bhushan Singh News Update : विनयभंग झालेल्या कुस्तीपटुंकडे पोलिसांनी मागितले ते फोटो अन् व्हिडिओ..

Brij Bhushan Singh News : विनयभंग केल्याचे फोटो, व्हिडिओ, आँडिओ क्लिप पाठवा
Brij Bhushan Singh News
Brij Bhushan Singh NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भाजपचे खासदार, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात विनयभंगाच्या तक्रारी दाखल करणाऱ्या दोन महिला कुस्तीपटुंकडे दिल्ली पोलिसांनी पुरावे मागितले आहे. याबाबत पोलिसांनी त्यांना नोटिस पाठवली आहे. (bhushan sharan singh sexual harassment case police asked wrestlers to give proof)

दिल्ली पोलिसांनी संबधीत कुस्तीपटुंना पुरावा म्हणून विनयभंग केल्याचे फोटो, व्हिडिओ, आँडिओ क्लिप पाठवण्यास सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळ वळण लागलं आहे.

Brij Bhushan Singh News
Sanjay Raut Slams Amit Shah : 'ये डर अच्छा है..; शाहांच्या ठाकरेंवरील टीकेला राऊतांचे सडेतोड उत्तर, मातोश्रीचा धसका...

दोन महिला कुस्तापटुंनी २१ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथील कॅनाँट प्लेस पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी स्पर्धांच्या वेळी, कुस्ती संघटनेच्या कार्यालयात वेळोवेळी श्वास तपासणी करताना विनयभंग केल्याचा आरोप आहे.

परदेशात पदक जिंकल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्याला जबरदस्तीने १० ते १५ सेकंद मिठ्ठी मारली होती, असा आरोप एका कुस्तीपटुंने केला आहे. याबाबत पोलिसांना त्याचा पुरावा मागितला आहे. 'आमच्याकडे जे पुरावे होते ते आम्ही पोलिसांनी दिले आहे,' असे कुस्तीपटुंने सांगितले आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात १५ जूनपर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी दिले आहे.

Brij Bhushan Singh News
NCP News : पवार, राऊतांना धमकी ; कारवाईसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर..

या प्रकरणातब्रिजभूषण सिंह व सचिव विनोद तोमर हे मुख्य आरोपी आहेत. ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंचा अनेकदा विनयभंग केला. त्यांना वाईट हेतूने स्पर्श केला. श्वास तपासण्याच्या नावाखाली त्यांचे टी-शर्टही काढले, आदी गंभीर आरोप कुस्तीपटुंनी केले आहेत.

यात सात कुस्तीपटुंनी त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. अल्पवयीन कुस्तीपटुं खेळाडूचा विनयभंग केल्याचा आरोप ब्रिजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आला आहे. यात विनोद तोमर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विनयभंगाच्या दहा तक्रारी करण्यात आल्या आहेत

Brij Bhushan Singh News
Praful Patel News : प्रफुल्ल पटेल कसे बनले पवारांचे निकटवर्तीय ? ; NCPचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पद, सहा वेळा खासदार..

कुस्तीपटुंच्या पोटाला हात लावल्याचा ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप केला आहे. जखमी महिला खेळाडूचा खर्च असोसिएशनने उचलण्यासाठी त्यांनी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. खेळाडूंनी यास नकार दिला असता त्यांनी चाचणीमध्ये त्यांच्याशी भेदभाव केला, असे तक्रारीत म्हटलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com