Smruti Irani On Sanatan :  Sarkarnama
देश

Smriti Irani On Sanatan : "जोपर्यंत भक्त जिवंत आहेत.." ; सनातन धर्मावर झालेल्या वक्तव्यानंतर स्मृती इराणी कडाडल्या..

Smruti Irani Criticize Udhayanidhi Stalin : "सनातन धर्माला डेंग्यू, मलेरियाप्रमाणे नष्ट करावे लागेल.."

Chetan Zadpe

New Dehli News : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र व राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी 'सनातन धर्मा'वर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुरू झालेला वाद थांबताना दिसत नाही. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आता या वादात उडी घेतली आहे. इराणी म्हणाल्या,"जोपर्यंत भक्त जिवंत आहेत, तोपर्यंत कोणीही धर्माला आव्हान देऊ शकत नाही." त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. (Latest Marathi News)

राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात इराणी म्हणाल्या, "सनातन धर्माला आव्हान देणाऱ्यांपर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे की, जोपर्यंत भक्त जिवंत आहे, तोपर्यंत कोणीही त्यांच्या धर्माला आव्हान देऊ शकत नाही."

काय म्हणाले उदयनिधी ?

'अशा काही गोष्टी आहेत ज्यांना विरोध करता येत नाही., त्यांना नष्ट करून टाकणे आवश्यक हा एकमेव उपाय आहे. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. त्याचा नायनाट करायचा असतो. त्या प्रमाणेच सनातन धर्मालाही नष्ट करावे लागेल. सनातनला विरोध करण्याऐवजी त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे," असे उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते.

FIR दाखल -

दरम्यान मंत्री उदयनिधी आणि काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्मावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उत्तर प्रदेशात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे. ज्येष्ठ वकील हर्ष गुप्ता आणि राम सिंह लोधी यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करत, रामपूर येथे एफआयआर दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT