NCP MLA Threatened: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला टॅक्सी चालकाकडून धमकी

Raju Kormore News: वाकोला पोलीस टॅक्सी चालकाचा शोध घेत आहेत.
NCP News
NCP News Sarkarnama

Mumbai NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मतदारसंघातील आमदार राजू कोरमोरे यांना एका टॅक्सी चालकाने धमकावल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कोरमोरे यांनी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरून आमदार कोरमोरे आणि टॅक्सी चालक यांच्यात वाद झाला त्याचे पर्यवसान भांडणात झाले.

NCP News
Udhayanidhi Stalin New : स्टॅलिन यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट करणारे भाजप नेते अमित मालवीय अडचणीत ? गुन्हा दाखल

कोरमोरे हे टॅक्सीने वाकोला जंक्शन सांताक्रूझ येथून कुलाबा येथील आमदार निवासस्थानाकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी टोलचे पैसे देण्यावरून टॅक्सीचालकासोबत त्यांचा वाद झाला. टॅक्सी चालकाने आमदार कोरमोरे यांना धमकावत टॅक्सीतून उतरवले.

NCP News
Imran Pratapgarhi News : मोदींबाबतचा 'तो' दावा काँग्रेस खासदाराने खोडून काढला ; मणिपूरवर बोलायचे नाही, म्हणून मोदींनी सुट्टी घेतली...

या प्रकरणी कोरमोरे यांनी वाकोला पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस टॅक्सी चालकाचा शोध घेत आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com