Asaduddin Owaisi on Bangladesh Violence Sarkarnama
देश

Asaduddin Owaisi on Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्यांवर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

AIMIM Asaduddin Owaisi News : बांगलादेशात सध्या अराजकता परसलेली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत, देश सोडला आहे. तर आंदोलकांनी हिंदूंची घरं आणि मंदिरांना लक्ष्य करणं सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू आहे. आतापर्यंत तेथील हिंसाचारात तीनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकूणच परस्थिती अतिशय भयानक आणि चिंताजनक आहे.

संपूर्ण जगाचे बांगलादेशमधील उलथापालथीकडे लक्ष आहे. दरम्यान आता बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन(AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ओवेसींनी(Asaduddin Owaisi) म्हटले आहे की, 'बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या बातम्या अतिशय चिंताजनक आहेत. बांगलादेशचे सरकार आणि अधिकाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत तेथील अल्पसंख्यांकांच्या जीवाचे आणि संपत्तीचे रक्षण करणे कर्तव्य आहे.'

तसेच त्यांनी म्हटले की, 'हल्ल्यांच्या बातम्यासोबतच अशाही बातम्या समोर येत आहेत की, बहुसंख्याक समुदायाचे अनेक लोक अल्पसंख्याक समुदायांची घरं आणि प्रार्थना स्थळांचे रक्षण करत आहेत. हा आदर्श असायला हवा आणि याचे सर्वांनी पालन केले पाहिजे.'

अजय आलोक यांनी ओवेसींवर साधला होता निशाणा -

बांगलादेशातील सत्तापालटानंतर हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते अजय आलोक यांनी सोमवारी यावरून भारतात धर्मांतरणाबाबत कडक कायद्याचे समर्थन करत, काँग्रेसच सरचिटणीस प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) आणि एमआयएमचे प्रमुख ओवेसींवर निशाणा साधला होता.

अजय आलोक यांनी एक्सवर पोस्टद्वारे दावा केला होता की, बांगलादेशात सत्तापालट होताच हिंदूंना मारलं जात आहे, आंदोलक घरात घुसत आहेत. जर आपण आताच जागे झाले नाही तर 20-30 वर्षांनी भारतामधील अनेक राज्यांमध्येही असेच दृश्य असू शकते. लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यक आहे. धर्मांतरणावरतर आणखी कडक कायदा असायला हवा. आता आपल्या पूर्वेस आणि पश्चिमेस इस्लामिक दहशतवाद बिनधास्त असणार आहे.

याशिवाय भाजप(BJP) नेते अजय आलोक यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे हेही म्हटले होते की, मुसलमानांची जाहीरपणे काळजी करणारे प्रियंका गांधी आणि असदुद्दीन ओवेसी आता बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यावर मौन धारण करून बसतील. एकमही मुस्लीम नेता किंवा मौलवी आवाहन करणार नाही की, हिंदूंना मारू नका. या गोष्टी देशाने लक्षात घेतल्या पाहिजेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT