Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार सभांचा धडका सुरू आहे. अगदी गाव खेड्यापासून ते मेट्रो शहरांमध्ये दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडत आहेत. लोकसभा निवडणुकीचे आतापर्यंत तीन टप्पे पार पडले आहेत. तर 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
दरम्यान प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Modi) काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधींच्या तुलनेत दुप्पट अधिक प्रचारसभा घेतल्या आहेत. एवढच नाहीतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांच्या सभांचा आकडा एकत्रित केला तरीही मोदींच्या सभा त्यापेक्षा जास्त झालेल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर, जवळपास 15 दिवसांनी म्हणजे 31 मार्च रोजी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी आपल्या प्रचार अभियानास सुरुवात केली होती. मोदींनी 31 मार्च ते 5 मे पर्यंत 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तब्बल 83 प्रचारसभांना संबोधित केलं. तर राहुल गांधींच्या(Rahul Gandhi) प्रचारसभांची याच कालावधीमधील संख्या ही 40 आहे. ही आकडेवारी इंडिया टुडेद्वारे विश्लेषण केल्या गेलेल्या सार्वजनिक संख्येतून समोर आली आहे.
या विश्लेषणामध्ये प्रचारसभा आणि रोड शोचा समावेश होता. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या चौघांचा समावेश आहे. हे चौघेही आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 66 निवडणूक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तर प्रियंका गांधी यांनी 29 प्रचारसभा घेतल्या आहेत. एकट्या पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभा आणि रॅलींची संख्या 83 आहे. तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या एकत्रित रॅलींची संख्या ही 69 आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.