Asaram Bapu Sarkarnama
देश

Asaram Bapu Case : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; शिक्षा माफीची याचिका फेटाळत दिला 'हा' सल्ला

Supreme Court Refuses Asaram Plea: आरोग्याच्या कारणास्तव बलात्कार प्रकरणातील शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी आसाराम बापूच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Ganesh Thombare

Delhi News : बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव बलात्कार प्रकरणातील शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी आसाराम बापूच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आसाराम बापूच्या या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. (Marathi News)

या वेळी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आसाराम बापूच्या वकिलाला राजस्थानच्या उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. तसेच राजस्थान उच्च न्यायालयात आपली मागणी मांडण्यास सांगितले. याबरोबरच राजस्थान (Rajasthan) उच्च न्यायालयाला आसाराम बापूची ही याचिका त्वरित निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आसाराम बापूच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं की, या खटल्यासाठी आपण 11 वर्षे 7 महिन्यांपेक्षा जास्त काळ कोठडीत घालवला आहे. आता आसाराम बापूचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त असून, गंभीर आजारांनी त्रस्त असल्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव शिक्षेला स्थगिती मिळण्याच्या याचिकेवर विचार व्हावा, असं म्हटलं.

आसाराम बापूला 2018 मध्ये बलात्कारासह लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून आसाराम बापू कोठडीत आहे. एका किशोरवयीन मुलीच्या तक्रारीनुसार, आसाराम बापूने तिला जोधपूरजवळील आश्रमात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, आसाराम बापूच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत महाराष्ट्रातील खोपोली येथील माधवबाग हार्ट हॉस्पिटलमध्ये पोलिस कोठडीत उपचार घेता येतील, अशी मागणी केली होती. मात्र, यावर सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालय (High Court) काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT