Maharashtra Politics : विधान भवनाचा 'आखाडा' होणं काही नवं नाही; यापूर्वीही 'या' आमदाराला मनसे आमदारांनी दिला होता 'प्रसाद'!

Clash between Shivsena MLA : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार थोरवे यांच्यात आज विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार भांडण झाले. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली.
Abu Azmi Shishir Shinde,Ram Kadam, Ramesh Wanjale, Vasant Gite
Abu Azmi Shishir Shinde,Ram Kadam, Ramesh Wanjale, Vasant GiteSarkarnama

Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन आमदारांचे आज विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार भांडण झाले. राज्याच्या विधिमंडळासाठी असे प्रकार काही नवीन नाहीत. मागे एकदा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना मनसेच्या आमदारांनी मारहाण केली होती. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले होते. मनसेच्या चार आमदारांना निलंबित करण्यात आले होते. शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या छगन भुजबळ यांना सभागृहात आणताना बाहेर शिवसेनेच्या एका आमदाराने पिस्तूल दाखवले होते. त्यावेळी तत्कालीन मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी त्या आमदाराला ढकलून देऊन भुजबळ यांना आत नेले होते. (Marathi News)

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) अनेक पक्षांचा सहभाग असल्याने अंतर्गत धुसफूस वाढली आहे. निवडणूक जवळ येईल तशी ही धुसफूस उग्र रूप धारण करत आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज त्याचा पुन्हा प्रत्यय आला. महाविकास आघाडीतून बाहेर पडताना शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून एक समान कारण देण्यात आले होते. ते म्हणजे आमची कामे होत नाहीत. याच कारणावरून आज शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे (रायगड) आमदार महेंद्र थोरवे यांच्यात जोरदार भांडण झाले. आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abu Azmi Shishir Shinde,Ram Kadam, Ramesh Wanjale, Vasant Gite
Maharashtra Assembly : शिवसेनेचे दोन आमदार विधिमंडळाच्या लॉबीत भिडले; तर शंभूराज देसाई म्हणतात...

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांना नोव्हेंबर 2009 मध्ये मनसेच्या आमदारांनी सभागृहात मारहाण केली होती. त्यामुळे मनसेचे त्यावेळचे आमदार शिशिर शिंदे, रमेश वांजळे, वसंत गिते आणि राम कदम यांना चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी अधिवेशनाच्या प्रारंभी आमदारांना शपथ दिली जात होती.

अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतली होती. त्यामुळे मनसेच्या या आमदारांनी त्यांना थापडा लगावल्या होत्या. त्यानंतर बराच काळ त्याचे पडसाद उमटले. सर्व आमदारांनी मराठीतूनच शपथ घ्यावी, अशी मागणी मनसेच्या आमदारांनी केली होती. अबू आझमी यांनी हिंदीत शपथ घेतल्याने चिडून जाऊन मनसेच्या आमदारांनी ते कृत्य केले होते.

त्यापूर्वी अबू आझमी यांनी विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती हिंदीतून द्यावी, अशी मागणी केली होती. त्याचाही राग मनसेच्या (MNS) आमदारांना होताच. हिंदीतून शपथ घेतल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले होते. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या आमदारांवर कारवाईचा ठराव सभापतींसमोर ठेवला होता. अबू आझमींना मारहाणीचे भाजपने समर्थन केले होते, शिवसेनेने मनसेच्या आमदारांचा निषेध केला होता. विधानसभेच्या अध्यक्षांनी चारही आमदारांना निलंबत केले होते. नंतर तो निर्णय स्थगित करण्यात आला होता.

डॉ.पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या सावलीप्रमाणे राहायचे. शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात करण्यात आलेले बंड मोडून काढण्यात डॉ. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये पक्षांतर केले. त्यानंतर त्यांना विधिमंडळात प्रवेश करणे अवघड झाले होते. त्यांच्या गटाला मान्यता देण्यासाठी भुजबळ आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना विधिमंडळात आणणे गरजेचे होते.

मात्र, शिवसैनिकांच्या दहशतीमुळे ते शक्य होत नव्हते. त्यावेळी डॉ. पाटील यांनी भुजबळ आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना स्वतःच्या निगराणीखाली विधिमंडळात आणले होते. त्यावेळी नागपूर विधिमंडळाच्या बाहेर गोंधळ झाला होता. शिवसेनेच्या एका आमदाराने त्यावेळी पिस्तूल दाखवले होते. डॉ. पाटील यांनी त्या आमदाराला बाजूला ढकलून देत भुजबळ आणि आमदारांना सभागृहात नेले होते.

विधिमंडळ सभागृहात चर्चा, आरोप-प्रत्यारोपांतून आमदार हातघाईवर येत असतात. शिवीगाळ, आक्षेपार्ह भाषेचा वापरही केला जातो. अबू आझमी यांना भर सभागृहात मारहाण हे आतापर्यंतचे सर्वात गंभीर प्रकरण असावे. आज शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारामध्ये झालेला प्रकारही गंभीर आहे. मात्र, आता सत्ताधारी पक्षांकडून सारवासारव केली जात आहे. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse ) यांच्याशी शाब्दिक चकमक झाली, असे स्पष्टीकरण आमदार थोरवे यांनी दिले, तर काहीही झाले नाही, असे मंत्री भुसे म्हणत आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Abu Azmi Shishir Shinde,Ram Kadam, Ramesh Wanjale, Vasant Gite
Pramod Jathar : एक रुपयाचेही काम न करणाऱ्या खासदारांचा पराभव निश्चित; प्रमोद जठारांनी राऊतांविरोधात थोपटले दंड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com