Ashok Gehlot, Sachin Pilot News Sarkarnama
देश

Rajasthan Politics : राजस्थान काँग्रेसमधील मतभेद मिटले ? सचिन पायलटांच्या समर्थनार्थ अशोक गेहलोत मैदानात

Sachin Pilot News : राजस्थान काँग्रेसमधील मतभेद मिटले ?

सरकारनामा ब्यूरो

Ashok Gehlot & Sachin Pilot News : मिझोरामची राजधानी ऐझॉलमध्ये हवाई दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या वादात भाजपने काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे नाव पुढे केले होते. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस नेते दिवंगत राजेश पायलट आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांची नावे घेत त्यांनी मिझोराममध्ये बॉम्ब टाकल्याचा आरोप केला होता. यानंतर राजेश पायलट यांचे पुत्र सचिन पायलट यांनी या आरोपांना उत्तर दिले. आता राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे सचिन पायलटांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.

या संदर्भात अशोक गेहलोत यांनी ट्विट करत भाजपवर (BJP) निशाणा साधला. अशोक गेहलोत म्हणाले, "काँग्रेस नेते राजेश पायलट हे भारतीय हवाई दलाचे शूर पायलट होते. त्यांचा अपमान करून भाजप भारतीय हवाईदलाच्या बलिदानाचा अपमान करत आहे. संपूर्ण देशाने याचा निषेध केला पाहिजे." गेहलोत यांनी सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या सूरात सूर मिसळत भाजपवर टीका केली आहे. यामुळे राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष संपला असल्याचे बोलेले जात आहे.

राजेश पायलट यांच्याबाबत अशोक गेहलोत यांच्या या वक्तव्यावरून अनेक अर्थ काढले जात आहेत. किंबहुना, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपद आणि नेतृत्वावरून वाद सुरू असल्याची चर्चा होती. गेल्या काही महिन्यांमध्ये सचिन पायलट यांनीही अशोक गेहलोत सरकारविरोधात आघाडी उघडली होती. सचिन पायलटांना गेहलोत यांनी पहिल्यांदाच पाठिंबा दिला आहे. काँग्रेस (Congress) हायकमांडच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही नेत्यांमधील अंतर कमी झाले असावे, असे मानले जात आहे.

भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांना दावा केला होता की, ''मार्च 1966 मध्ये मिझोरममध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्यांमध्ये राजेश पायलटचाही समावेश होता. सचिन पायलट यांनी अमित मालवीय यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. सचिन पायलट म्हणाले होते, ऑक्टोबर 1966 मध्ये त्याचे वडील भारतीय हवाईदलात भरती झाले होते. तर मिझोरमची घटना मार्चमध्ये होती. त्यांनी लिहिले की, एक राजकारणी म्हणून राजेश पायलट यांनी मिझोराममधील युद्धविराम आणि शांतता करारात भूमिका बजावली होती.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT