देश

Himanta Biswa Sarma : मुख्यमंत्री सरमांचा खळबळजनक दावा; SIT चौकशीतून गोगोईंसह पत्नीला अडकवण्याची पूर्ण तयारी...

Assam CM Levels Serious Allegation Against Gaurav Gogoi’s Wife : गौरव गोगोई यांना मंगळवारी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष केले आहे. त्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत गोगोई यांनी बुधवारी सरमा यांच्यावर प्रहार केले.

Rajanand More

Impact on Assam’s Political Climate : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार गौरव गोगोई यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहे. गोगोई यांचा उल्लेख त्यांनी पाकिस्तानचे एजंट म्हणून केला आहे. तर गोगोईंच्या पत्नीने हेरगिरी केल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. याबाबतचे पुरावे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

गौरव गोगोई यांना मंगळवारी काँग्रेसने आसामचे प्रदेशाध्यक्ष केले आहे. त्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत गोगोई यांनी बुधवारी सरमा यांच्यावर प्रहार केले. तसेच त्यांचे आरोपही फेटाळून लावले. दक्षिण आशियाई संस्थेच्या हवामान बदलाच्या एका प्रोजेक्टसाठी आपली पत्नी पाकिस्तानला गेली होती. आपणही तिच्यासोबत गेलो होतो, अशी कबुली गोगोई यांनी पहिल्यांदाच दिली.

सरमा यांनी मात्र गोगोई यांच्या पुन्हा धक्कादायक आरोप करत ते खोटे बोलत असल्याचे सांगितले. पाकिस्तानला गेल्याचे त्यांनी अखेर मान्य केले आहे. पण गोगोई यांच्या पाकिस्तान भेटीचा आणि पत्नीचा काही संबंध नाही. गोगोई हे पाकिस्तान सरकारच्या निमंत्रणावरून तिथे गेले होते, असे सरमा यांनी स्पष्ट केले.

हा शेवट नाही तर सुरूवात असल्याचे सूचक विधानही सरमा यांनी केले आहे. यापुढील काळात अनेक गंभीर बाबी समोर येणार आहेत. विश्वसनीय माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध आहेत. गोगोई यांची पाकिस्तानी सत्तेसोबत जवळीक असल्याचे त्यातून स्पष्ट होते. हे खूप चिंताजनक आहे, असे सरमा यांनी म्हटले आहे.

विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी तपास पूर्ण झाल्यानंतर १० सप्टेंबरला संपूर्ण सत्य सार्वजनिक केले जाईल. आसाम आणि देशातील जनतेला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी अशा खतरनाक आणि संशयित व्यक्तीला सार्वजनिक जीवनात पुढे करण्याचे धाडस दाखवले आहे. जनता हे विसरणार नाही. ही देशहिताविरोधात गंभीर चूक असल्याची टीका सरमा यांनी केली आहे.

गोगोई यांची पत्नी हेरगिरी करत होती. त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. हवामान बदलाच्या नावाखाली ही हेरगिरी सुरू असल्याचा आरोपही सरमा यांनी केला आहे. काँग्रेसची पाक लॉबीने गोगोई यांना प्रदेशाध्यक्ष केले. पाकिस्तानला भेट दिल्याची कबुली त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी का दिली नाही, असा सवालही सरमा यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT