Gaurav Gogoi News : मुख्यमंत्री सरमांचा दावा खरा ठरला; गोगोईंनी दिली पाकिस्तानात गेल्याची कबुली, म्हणाले, पत्नीसोबत...

Gaurav Gogoi's 2013 Pakistan Visit : हिमंता बिस्वा सरमा आणि गौरव गोगोई हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यातच काँग्रेसने मंगळवारी गोगोई यांना प्रदेशाध्यक्ष पदावर बढती दिली आहे.
Gaurav Gogoi with Wife
Gaurav Gogoi with WifeSarkarnama
Published on
Updated on

Assam CM Himanta Biswa Sarma's Allegations : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गोगोई आणि त्यांच्या पत्नीच्या पाकिस्तानातील भेटीबाबत सरमा यांच्याकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्या चौकशीसाठी एसआयटीही स्थापन केले आहे. या प्रकरणार गोगोईंनी बुधवारी पहिल्यांदाच भाष्य केले.

हिमंता बिस्वा सरमा आणि गौरव गोगोई हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यातच काँग्रेसने मंगळवारी गोगोई यांना प्रदेशाध्यक्ष पदावर बढती देत हा संघर्षामध्ये तेल ओतण्याचे काम केले आहे. हे पद मिळाल्यानंतर गोगोई हेही आक्रमक झाले असून त्यांनी सरमा यांच्यासह त्यांच्या सरकारवर हल्ला चढवला आहे.

गोगोई यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढले आहेत. गोगोई यांनी पाकिस्तानमध्ये गेल्याचेही मान्य केले आहे. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या निमंत्रणावरून गोगोई पाकमध्ये गेले होते. तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतले असा आरोप सरमा यांनी केला होता.

Gaurav Gogoi with Wife
Manipur Government : मणिपूरमध्ये पुन्हा राजकीय भूकंप; सत्तास्थापनेसाठी 44 आमदारांच्या हालचाली, नेते राज्यपालांना भेटले...

गोगोई यांनी हे आरोप फेटाळताना सांगितले की, जवळपास 14 ते 15 वर्षांपूर्वी माझी पत्नी दक्षिण आशियाई संघटनेच्या एका हवामान बदलाच्या प्रोजेक्टसाठी पाकिस्तानात गेली होती. ती वर्षभर तिथे होती. ती तिथे असतानाही मीही एकदा तिच्यासोबत गेले होतो, असा खुलासा गोगोई यांनी केला आहे.

Gaurav Gogoi with Wife
लालूंनी नातवाला दिले ‘या’ देवाचे नाव; कधी ऐकला नसेल हा शब्द...

सी-ग्रेड सिनेमा

गोगोई यांनी सरमा यांच्या आरोपांना सी-ग्रेड सिनेमा म्हटले आहे. आता ते सी-ग्रेड बॉलीवूड चित्रपट तयार करत आहेत. त्यांनी 10 सप्टेंबर ही रिलिजची तारीखही जाहीर केले आहे. पण हा सिनेमा पूर्णपणे फ्लॉप होणार आहे. आम्ही जर काही चुकीचे केले असेल तर मागील 10-11 वर्षांपासून त्यांचेच सरकार आहे. केंद्रीय यंत्रणा काय करत आहेत, असा सवालही गोगोई यांनी केला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमधून लक्ष विलचित करण्यासाठी आपल्या कुटुंबाविरोधात मोहिम सुरू असल्याचा दावाही गोगोई यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com