Himanta Biswa Sarma, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसला धक्का; राहुल गांधींना इशारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी दोन आमदारांची हातमिळवणी

Himanta Biswa Sarma : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींना अटकेचा इशारा दिला होता.  

Rajanand More

Assam News : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये पोलिस आणि कार्यकर्ते भिडले होते. या वेळी झालेल्या गोंधळानंतर पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींना अटक करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये पक्षाच्या कार्याध्यक्षांचाच समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. (Congress News)

काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार कमलख्या डे पुरकायस्थ यांनी बुधवारी आपला पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्या सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्यापाठोपाठ दुसरे आमदार बसंता दास यांनीही सरकारला पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे.

पुरकायस्थ यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करताना म्हटले आहे की, सध्याचे सरकार करत असलेल्या विकासकामांमुळे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो असल्याने पक्षातच राहणार आहे. विकासकामांमुळे अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशानेच हा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांनी दोन आमदारांच्या पाठिंब्याचे स्वागत केले आहे. पुढील काही दिवसांत अशा आणखी घडामोडी पाहायला मिळतील, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. आणखी काही आमदार भाजप (BJP) सरकारला पाठिंबा देतील, असे ते म्हणाले आहेत. संबंधित आमदारांबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोराह यांनी म्हटले आहे.  

काँग्रेसला पहिल्यांदाच असा धक्का बसलेला नाही. त्याआधी 2021 मध्येही एका आमदाराने सरकारला पाठिंबा जाहीर केल्याने पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तर 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीत आमदार सिद्दिकी अहमत यांनी क्रॉस व्हाेटिंग केले होते. काँग्रेसला 2021 मध्ये आसाममध्ये 29 जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर दोन आमदारांनी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीत पुन्हा दोन्ही आमदार भाजपच्या तिकिटावर निवडून आले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT