Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

Pahalgam Attack Conspiracy : पहलगाम हल्ला मोदी-शहांचा कट म्हणणाऱ्या आमदारासह 27 जणांना अटक

Assam MLA Aminul Islam Arrested : पहलगाम हल्ल्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा कट असल्याचे आमदाराने म्हटले होते. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Roshan More

Pahalgam Attack News : पहलगाम आतंकवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्याचा देशभर निषेध करण्यात येत आहे. भारत सरकार या हल्ल्याचा विरोधात जी भूमिका घेईल त्याला विरोध पक्षांचा पाठींबा असेल असे सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी सांगितले. मात्र, हल्ला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आसामधील आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले होते.

आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आमदार हाजी अमीनुल इस्लाम याने पहलगाम हल्ल्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा कट असल्याचे म्हटले होते. इस्लाम याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा देखील झाला होता. त्याला पोलिसांनी गुरुवारी (ता.24) पोलिसांनी अटक केली होती. इस्लामसह पहलगाम हल्ल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तसेच देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या 27 जणांना आत्तापर्यंत आसाम पोलिसांनी अटक केली आहे.

हाजी अमीनुल इस्लाम म्हटले की, 2019 मध्ये जो पुलवामामध्ये सीआरएफच्या जवानांच्या गाडीवर हल्ला झाला होता आणि आत्ता जो हल्ला झाला आहे. तो कटाचा भाग आहे. याची निष्पक्षपणे केंद्र सरकारने चौकशी करावी अन्यथा हिंदू-मुस्लीम राजकारणासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा हा कट असल्याचे आम्ही समजू.

अमीनुल इस्लाम याच्या वक्तव्याचा भाजप आणि इतर पक्षांकडून निषेध करण्यात आला होता. इस्लाम ज्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आमदारा आहे त्या पक्षाने देखील त्याच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली. इस्लाम प्रमाणे पहलगाम हल्ल्याबाबात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तब्बल 27 जणांना आत्तापर्यंत अटक केली असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानाला कायमचा धडा मिळणार?

मंगळवारी (ता.29) दिल्लीत घडामोडींना वेग आला होता. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या निवास्थानी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवले देखील या बैठकीला हजर होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला खुली सूट दिली आहे. कधी आणि कोठे कारवाई करायची हा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सैन्याला मोदींनी दिले आहेत. त्यामुळे पाकिस्ताना विरुद्ध युद्धाच्या दिशेने हे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानाला कायमचा धडा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT