Pakistan Cyber Attack : भारतावर ‘स्ट्राईक’चा पाकिस्तानचा प्रयत्न फसला; सायबर सुरक्षा भेदण्यात अपयश...

Critical Indian Websites Targeted by Hackers : पाकिस्तानकडून भारताच्या डिजिटल सुरक्षेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Pakistan  Cyber Attack
Pakistan Cyber AttackSarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला विविध मार्गाने अद्दल घडवली जात आहे. त्यामध्ये डिजिटल स्ट्राईकचाही समावेश आहे. पाकिस्तानशी संबंधित काही यू ट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली असून पाकच्या संरक्षणमंत्र्यांसह सरकारचे एक्स हँडलही ब्लॉक करण्यात आले आहे. त्यानंतर आता पाकिस्तानकडून भारताची सायबर सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानकडून भारताच्या डिजिटल सुरक्षेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, त्यात पाकला अपयश आले आहे. आयओके म्हणजेच इंटरनेट ऑफ खिलाफा या नावाने काम करणाऱ्या हॅकर्सच्या एका गटाने भारताच्या महत्वाच्या वेबसाईट विकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन सेवांमध्ये अडथळे आणणे, वैयक्तिक माहिती चोरण्याचा पयत्न करण्यात आला आहे. मात्र, भारताच्या मजबूत सायबर सुरक्षा प्रमाणीमुळे पाकचा भांडाफोड झाला. हा गट पाकिस्तानातून कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pakistan  Cyber Attack
Congress Vs BJP : मोदींवरील ‘गायब’ पोस्टवरून घमासान; पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी डिवचलं, भाजपने काँग्रेसला झोडले

‘एनडीटीव्ही’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. याप्रकरणी चार घटना समोर आल्या आहेत. श्रीनगरमधील आर्मी पब्लिक स्कूल आणि एपीएस राणीखेत च्या संकेतस्थळावर भडकाऊ प्रचार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच एपीएस श्रीनगरच्या वेबस्टाईटही हँक करण्याचा प्रयत्न झाला. आर्मी वेल्फेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशनची माहिती चोरण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे.

पाक हॅकर्सकडून भारतीय वायूसेना प्लेसमेंट ऑर्गनायझेशनच्या पोर्टललाही लक्ष्य करण्यात आले होते. हे लक्षात येतात तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे कोणतीही महत्वाची माहिती चोरली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने एकप्रकारे युध्दाची तयारी सुरू केल्याने पाकिस्तानची घाबरले आहे. त्यामुळे असे प्रकार सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे.

Pakistan  Cyber Attack
Pahalgam Terror Attack : पहलगामनंतर पुन्हा हल्ल्याची भीती; अखेर जम्मू-काश्मीर सरकारने घेतला मोठा निर्णय

दरम्यान, पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी भारताकडून मोठा प्लॅन तयार केला जात असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिल्लीत सातत्याने बैठका घेतल्यात जात आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सुरक्षा सल्लागार डोवाल, तिन्ही दलाचे प्रमुख दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे भारताकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com