BJP, Congress Sarkarnama
देश

Assembly Elections 2024 : भाजपकडून ‘खेला’! काँग्रेसमधील 'त्या' सहा बंडखोरांना उमेदवारी

BJP Political News : काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे.

Rajanand More

Himachal Pradesh News : हिमाचल प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वीच मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले. आता हेच आमदार भाजपच्या तिकिटावर पोट निवडणुकीत (Assembly Elections 2024) उतरले आहेत. तीन दिवसांपूर्वीच ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपकडून (BJP) आज उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. धर्मशाळा, सुजानरपूर, कुटलेहड, लाहौल स्पीती, गगरेट आणि बडसर मतदारसंघात एक जून रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघातून अनुक्रमे सुधीर शर्मा, राजिंदर राणा, देवेंद्र भुट्टो, रवी ठाकूर, चैतन्य शर्मा आणि इंद्रदत्त लखनपाल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हिमाचलमध्ये मागील महिनाभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. विधानसभा अध्यक्षांनी सहा आमदारांना अपात्र घोषित केल्यानंतर त्यांनी 23 मार्चला भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अपक्षांनीही सोडली आमदारकी

राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या तीन अपक्ष आमदारांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. मागील आठवड्याततच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हिमाचलमध्ये सहा जागांवर पोटनिवडणूक होऊ शकते, असे अंदाज होता. पण आयोगाकडून सहा जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे.

निवडणुकीनंतर काय?

हिमाचल प्रदेश विधानसभेत एकूण 68 आमदार आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसला (Congress) 40 जागा, तर भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत विजय मिळवला होता. बहुमतासाठी 35 हा जादुई आकडा आहे. पोटनिवडणुकीत भाजप सर्व सहा जागा जिंकल्यास त्यांच्या आमदारांचा आकडा 31 पर्यंत पोहाेचतो. त्यानंतरही काँग्रेसला धोका नाही. सहा अपक्ष आमदारांनी राजीनामा दिल्याने विधानसभेचे त्यावेळचे एकूण संख्याबळ 65 होईल, तर बहुमतासाठी 33 चे संख्याबळ आवश्यक असेल. काँग्रेसकडे सध्यातरी 34 आमदार आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT